शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

ड्रायव्हिंग लायसन्स, PUCची मुदत संपली तरी घाबरू नका; नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 6:01 PM

केंद्रीय मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तीच मुदतवाढ आता 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

नवी दिल्लीः मोटार वाहन कागदपत्रांची वैधता म्हणजेच मुदत संपली असल्यास घाबरू नका, ती मुदत वाढवण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. केंद्रीय मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तीच मुदतवाढ आता 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. फिटनेस, परमिट (सर्व प्रकारचे), PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी किंवा विमा इतर कोणतीही संबंधित कागदपत्रे ज्यांची वैधता संपलेली आहे किंवा देशव्यापी लॉकडाऊनमुळे त्यांचं नूतनीकरण करण्यात अडचणी येत आहेत. अशांसाठी हा आदेश देण्यात आलेला आहे.पूर्वी मंत्रालयाने जाहीर केलेली मुदत 30 जून होती. मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटाची परिस्थिती अद्यापही कायम आहे. त्यामुळे ही मुदत वाढवण्यात येत असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. 1 फेब्रुवारीनंतर प्रलंबित असलेल्या कागदपत्रांच्या वैधतेमध्ये होणा-या दिरंगाईसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क किंवा उशीरा फी आकारली जाणार नाही. वाहन चालक आणि नागरिकांची अडचण लक्षात घेता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं हे आदेश दिले आहेत. 31 जुलै 2020 पर्यंत शुल्क भरण्यास विलंब झाल्यास कोणतेही अतिरिक्त किंवा उशिरा शुल्क आकारले जाणार नाही. तत्पूर्वी देशातील ज्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, PUCसारख्या कागदपत्रांची मुदत १ फेब्रुवारी ते ३० जूनच्या कालावधीत संपत आहे, त्यांची मुदत ३० जून २०२० पर्यंत वाढविण्यात आली होती. लॉकडाऊनमुळे या कागदपत्रांचे नूतनीकरण करणं अशक्य असल्याचंही सांगण्यात येत होते. मोटार वाहन अधिनियम १९८८ आणि  मोटार वाहन अधिनियम १९८९ नुसार ही मुदत वाढविण्यात आली आहे. कोणतेही वाहन चालविताना चार कागदपत्रे अत्यंत आवश्यक असतात. ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र, इन्शुरन्स आणि पीयूसी असणे आवश्यक असते. ओरिजनल कागदपत्रे सोबत ठेवता येत नसली तरीही त्यांच्या प्रिंट कॉपीबरोबर ठेवू शकतो. तसेच डिजिलॉकर आणि एम परिवहन सारख्या ऍपवरही त्या कॉपी अपलोड करून ठेवता येतात. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस