नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे भारत, जपान, थायलंड व अमेरिका या देशांमध्येही नव्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करत चीनने तीन वर्षांपासून बंद असलेल्या आपल्या सर्व सीमा खुल्या केल्या असून, बाहेरून येणाऱ्यांसाठी क्वारंटाईनचा मोठा प्रोटोकॉलही रद्द केला आहे.
चीनने आंतरराष्ट्रीय पर्यटक व नववर्षासाठी मायदेशी येऊ इच्छिणाऱ्यांसाठी सीमा खुल्या केल्या असून, विलगीकरणाचे बंधनही हटवले आहे. चीनमध्ये चांद्र नववर्ष येत्या २१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. चीनमध्ये कोरोना बळींची संख्या वाढत असून, लोकांचे मृतदेह ट्रकमध्ये भरून स्मशानभूमीत नेले जात आहेत. चिनी कम्युनिस्ट पक्षावर लक्ष ठेवणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग यांनी सोशल मीडियावर याचा व्हिडीओ शेअर केला आहे.