नवी दिल्ली : कोरोनाचा संसर्ग झालेल्यांपैकी तीव्र लक्षणे दिसणा-या व प्रकृती गंभीर असलेल्या व्यक्तींवर अधिक लक्ष केंद्रित करता यावे व इस्पितळांसह एकूणच आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी व्हावा, या उद्देशाने अगदी सौम्य लक्षणे दिसणा-या किंवा अजिबात लक्षणे न दिसणाऱ्यांना त्यांच्या घरातच विलगीकरण करण्याची मुभा देणारी सुधारित मार्गदर्शिका केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केली.याबाबतच सगळे नियम, कोणत्या गोष्टी पाळाव्यात याची सविस्तर माहिती या मार्गदर्शिकेत दिली आहे.>ही काळजी घ्यावी लागणारलक्षणे सौम्य आहेत वा लक्षणे दिसत नसल्याचे डॉक्टरने ठरवायचे आहे. बाधिताची काळजी घेणारी व्यक्ती व इस्पितळ यांच्यात विश्वासार्ह व सतत उपलब्ध अससेली संपर्क व्यवस्था असावी.बाधिताने आरोग्यसेतू मोबाईल अॅप डाऊनलोड करावे.बाधितासाठी व्यक्तिगत वापराच्या वस्तू स्वतंत्र असाव्या.बाधिताने मास्क वापरावा व दर आठ तासांनी बदलावा.काळजी घेणारी व्यक्ती व संपर्कात येणाºया इतरांनी हाडड्रॉक्सीक्लोलोक्वीनच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित घ्याव्या.>ठरलेल्या मुदतीनंतर चाचणी घेऊन डॉक्टर तपासणी करून सर्व काही ठीक असल्याची खात्री करतील व निगराणी अधिकारी परवानगी देईल तेव्हाच घरात विलगीकरण केलेले बाधित त्यातून बाहेर येऊ शकतील.
कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्याचे घरात विलगीकरण करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 4:57 AM