नवी दिल्ली : एकवीस जूनला केंद्र सरकारने लस खरेदीसंबंधी नवीन धोरण घोषित केल्यानंतर लसीकरणाची साप्ताहिक गती ६० टक्के कमी झाली आहे. लसीचा तुटवडा असल्याची अनेक राज्यांची तक्रार आहे. २१ जून ९१ लाख डोस देण्यात आले होते आणि २७ जूनपर्यंत ४ कोटी लोकांना डोस देण्यात आले होते. त्यानंतर ५ ते ११ जुलैच्या आठवड्यात २.३ कोटी डोसचे वितरण करण्यात आले.
जानेवारीत सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत ३८ कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. २१ जूनला दररोज ६० लाख लोकांना लस देण्याचे ठरविण्यात आले होते. तथापि, भारताने लसीकरणाचा हा आकडा ३ जुलैला पार केला होता. वर्षअखेर सर्व प्रौढ नागरिकांची पूर्णत: लसीकरण करण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी दररोज ८० लाख डोस देणे जरूरी आहे.
अनेक राज्यांत लसीचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे.पुरेसी लस मिळत नसल्याने दररोजी दोन किंवा तीन लाख लोकांना लस दिली जात आहे. पुढील तीन महिन्यांसाठी दरमहा तीन कोटी डोसची मागणी करणारा ठराव अलीकडचे विधानसभेने संमत केला आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.