नवी दिल्ली - संपूर्ण जग कोरोना व्हायरसमुळे हैरान आहे. जवळपास सर्वच देश सुरक्षित कोरोना लशीची डोळे लावून वाट पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारदेखील कोरोना व्हायरसवरील लशीच्या रोलिंग रिव्ह्यूचा निर्णय घेऊ शकते. विशेषकरून ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाची लस लवकरात लवकर उपलब्ध करण्यासाठी ही प्रक्रिया सुरू होऊ शकते.
लशीची मान्यता प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी, ही लस यूनायटेड किंगडममध्ये आधीपासूनच अॅक्सिलेरेटेड रिव्ह्यूमध्ये आहे. कोरोना लशीसाठी तयार करण्यात आलेल्या नॅशनल एक्सपर्ट ग्रुपच्या (NEGVAC) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात संकेत दिले आहेत. भारतात ऑक्सफर्डच्या लशीचे ट्रायल सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) करत आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात ही ट्रायल कमी सॅम्पल साइजने होत आहे. रोलिंग रिव्ह्यूच्या माध्यमाने या लशीचे इव्हॅलुएशन प्रोसेस वेगाने केले जाऊ शकते.
अशा पद्धतीने केला जातो लशीचा रोलिंग रिव्ह्यू -एखाद्या लशीच्या रोलिंग रिव्ह्यूने रेग्यूलेटर्सना तिच्या क्लिनिकल ट्रायलचा डेटा रिअल-टाईम बेसिसवर तपासण्यासाठी मिळतो. सर्वसाधारणपणे कंपन्या सर्वप्रथम लशीचे ट्रायल करतात आणि नंतर त्यांचा डेटा रेग्यूलेटर्सना पाठवतात. 'रोलिंग रिव्ह्यू'मध्ये ट्रायल पूर्ण होण्याची वाट न पाहता भाग निहाय तपासणी होते. तसेच इमरजंसीमध्ये लशीला मंजुरी दिली जाऊ शकते. मात्र, रोलिंग रिव्ह्यूमुळे लशीची मान्यता प्रक्रिया अधिक वेगाने होते. यात रेग्यूलेटर्सना तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल संपण्याची वाट पाहावी लागत नाही.
यूकेच्या धरतीवर भारतातही रोलिंग रिव्ह्यू शक्य -यूके आणि ब्राझीलमध्येही ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाच्या लशीचे परीक्षण सुरू आहे. त्याचा डेटाही भारतीय रेगुलेटरसोबत शेअर करण्यात येणार आहे. कारण यूकेमध्ये मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्यूलेटरी अथॉरिटी (MHRA) संभाव्य लशीचे रोलिंग रिव्ह्यू करत आहे. कंपनी भारतातही अशा प्रकारच्या प्रोसेसची मागणी करू शकते.
परदेशातील ट्रायलवर भारताची नजर -नुकतेच SIIचे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितले होते, की या लशीचा सुरुवातीच्या ट्रायलमध्ये चांगला रिझल्ट आला आहे. मात्र, या लशीच्या परदेशात होत असलेल्या तिसऱ्या टप्प्यावरील ट्रायल्ससंदर्भात जाणण्याची सरकारची इच्छा आहे.
सीरम इंस्टिट्यूटला अप्लाय करावे लागेल -जागतिक स्थरावर आमचे लक्ष आहे. सीरम केवळ इम्युनोजेनिसिटी ट्रायल करत आहे. त्यांना यूके आणि ब्राझील येथील तिसऱ्या टप्प्यावरील ट्रायलचा क्लिनिकल डेटाही आम्हाला द्यावा लागेल. अम्हाला माहीत आहे, की यूके लशीसंदर्भात एक्सिलेरेटेड रिव्ह्यू करत आहे. यासाठी कंपनीने अर्ज केल्यास आपणही यासंदर्भात विचार करू शकतो.