नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचे तीन रुग्ण आढळल्यानंतर चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या एका सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा झाला आहे. सर्वेक्षणादरम्यान असे आढळून आले आहे की, भारतातील केवळ 2 टक्के लोकांनी हे मान्य केले आहे की, त्यांच्या भागात, शहर किंवा जिल्ह्यातील लोक मास्क वापरतात.
कोरोनावर मात करण्यासाठी मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र, मास्क वापरण्याच्या नियमाचे पालन कमी स्तरावर आहे, असे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. 'लोकल सर्कल' या डिजिटल प्लॅटफॉर्मने केलेल्या सर्वेक्षणानुसार, तीनपैकी एका भारतीयाचे म्हणणे आहे की, त्यांच्या भागातील बहुतेक लोक घराबाहेर पडताना मास्क घालत नाहीत.
64 जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षणएप्रिलमध्ये झालेल्या या सर्वेक्षणात भारतातील 364 जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या 25,000 हून अधिक लोकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. या सर्वेक्षणानुसार, 29 टक्के लोकांनी मास्क लावण्याच्या नियमाचे पालन करण्याचे प्रमाण खूप जास्त असल्याचे म्हटले आहे. मास्क लावण्याचे प्रमाण सप्टेंबरमध्ये 12 टक्क्यांवर घसरले आणि नंतर नोव्हेंबरमध्ये फक्त दोन टक्क्यांवर आले आहे.
मास्क लावण्यासाठी जागरूकता करण्याची गरज'लोकल सर्कल' या डिजिटल प्लॅटफॉर्मचे संस्थापक सचिन टपरिया म्हणाले, कोरोना व्हायरसचा ओमायक्रॉन व्हेरिएंट पाहता केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि जिल्हा प्रशासनाने नागरिकांमध्ये मास्क लावण्याबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक आहे. त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. त्यासाठी आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत.