नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 24 लाख 30 हजारांवर गेली असली तरी त्यापैकी सुमारे 6 लाख 38 हजार रुग्ण बरेही झाले आहेत. मात्र या संसर्गजन्य आजाराने 1 लाख 66 हजार जणांचा बळीही घेतला आहे. मोठमोठ्या कंपन्यांना कोरोनाचा फटका बसला असून आर्थिक नुकसान झालं आहे. जागतिक कंपन्यांची उत्पादनासाठी पहिली पसंती ही नेहमीच चीनला असते. मात्र आता कोरोनामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे चीनमधील जवळपास 1000 हजार कंपन्या भारतात येण्याच्या विचारात असल्याची माहिती मिळत आहे.
भारतात आपले कारखाने उभे करण्यासाठी या कंपन्यांनी सरकारमधील अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केली आहे. बिजनेस टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यांच्या रिपोर्टनुसार, कमीत कमी 300 मोबाईल कंपन्या, इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल डिव्हाइसेस, टेक्सटाईल्स आणि सिंथेटिक फॅब्रिक्स क्षेत्रातील कंपन्या भारतात कारखाने उभारण्यासाठी सरकारशी सक्रीय स्वरुपात संपर्कात आहेत. या कंपन्यांशी चर्चा यशस्वी झाली. तर चीनला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
भारत हा आगामी काळात उत्पादन क्षेत्रात पर्यायी हब ठरू शकतो असा या कंपन्यांचा दृष्टीकोन आहे. यामुळे सरकारकडे विविध पातळ्यांवर आपला प्रस्ताव त्यांनी दिला आहे. यात विदेशातील भारतीय दुतावास आणि विविध राज्यांच्या उद्योग मंत्रालयांचा यात समावेश आहे. केंद्र सरकारमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या जवळपास 1000 कंपन्या वेगवेगळ्या स्तरांवर जसे इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल सेल, सेंट्रल गव्हर्नमेंट डिपोर्टमेट्स आणि राज्य सरकारांशी चर्चा करत आहेत. यापैकी 300 कंपन्यांवर अधिक लक्ष केंद्रीय केलं आहे.
कोरोना व्हायरस नियंत्रणात आल्यावर आपल्यासाठी अनेक फायदेशीर गोष्टी समोर येतील. भारत हा उत्पादन क्षेत्रातील एक मोठा पर्याय म्हणून जागतिक पातळीवर समोर येईल. जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरियासारखे देश चीनवर प्रमाणपेक्षा अधिक अवलंबून आहे आणि हे स्पष्टपणे दिसतं असल्याचं देखील अधिकाऱ्याने म्हटलं आहे. देशात उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार गेल्या सप्टेंबरपासून मोठे निर्णय घेत आहे. कॉर्पोरेट करात कपात करून 25.17 टक्क्यांवर आणला आहे. नवी कारखाने उभे करणाऱ्यांचा कॉर्पोरेट कर कमी करून 17 टक्के केला आहे. हा कर दक्षिण पूर्व आशियात सर्वांत कमी आहे. कॉर्पोरेट करातील कपातीसबोतच देशात लागू केलेल्या जीएसटीमुळे देशातील उत्पादन क्षेत्रात मोठी गुंतवणूक भारताला अपेक्षित आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : चिंताजनक! देशात 24 तासांत 1,336 नवे रुग्ण, 47 जणांचा मृत्यू
Coronavirus : ...अन् रुग्णाची प्रकृती सुधारली, कोरोनाच्या उपचारात 'ही' थेरपी आशेचा किरण ठरली
CoronaVirus: दिलासादायक; कोरोना संसर्गाचा वेग मंदावला; रुग्ण दुपटीचा कालावधी ७ दिवसांवर