नवी दिल्ली - भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 3000 वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील 86 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोना व्हायरस भारतात कम्यूनिटी ट्रान्समिशन स्टेजला गेल्याची चर्चा होती. मात्र, आरोग्य मंत्रालयाने याचे खंडन केले आहे. मात्र देशात असे नऊ हॉट स्पॉट्स आहेत, ज्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. या ठिकाणी कम्युनिटी ट्रान्समिशन असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे या भागात विशेष खबरदारी घेतली जात आहे. अशातच एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. दिल्लीतील तब्बल 108 डॉक्टर आणि नर्सेस क्वारंटाईन करण्यात आले आहे.
कोरोनापासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्याने दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयातील मेडिकल स्टाफच्या 108 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत. यामध्ये डॉक्टर आणि नर्सेसचा समावेश आहे. हे सर्व लोक दोन कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले होते. 108 पैकी 85 जण आपापल्या घरी तर 23 जणांना रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. सर्व स्टाफलाी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
जगभरात आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा 10 लाखांच्या वर पोहोचला आहे. तसेच कोरोना व्हायरसचा संसर्ग आता जगातील 200 हून देशात झाला आहे. भारतात ही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरातील रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहेत. भारतातील रुग्णालयात बेडची संख्या कमी आहे. कोरोनाग्रस्तांवर योग्य उपचार करता यावेत यासाठी काही स्टेडियम आणि हॉटेल्सचं रुपांतर हे क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या या लढाईत इटलीतील तब्बल 51 डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली होती. इटलीत अनेक डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 7100 हून अधिक डॉक्टर, नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. जे कर्मचारी बरे होत आहेत त्यांना घरी पाठवले जात आहे आणि त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा कामावर बोलवले जात असल्याची माहिती मिळाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी गुगलचं खास डुडल, सुरक्षिततेसाठी सांगितला उत्तम उपाय
Coronavirus : कोरोना हेल्मेट पाहिलंत का?, जनजागृतीसाठी 'त्याने' लढवली अनोखी शक्कल
Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने दाम्पत्याची आत्महत्या, पोस्टमार्टम करण्यास डॉक्टरचा नकार
Coronavirus : हॉटेलपासून ट्रेनपर्यंत देशातील 'या' ठिकाणांचं होणार क्वारंटाईन सेंटरमध्ये रूपांतर
Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताला मोठं यश; व्हायरसला हरवण्यासाठी तयार केली लस!