CoronaVirus Updates: देशात पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ; 24 तासांत 22 हजार 842 नवे रुग्ण, लसीकरणाचा आकडा 90 कोटी पार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 10:59 AM2021-10-03T10:59:49+5:302021-10-03T11:00:40+5:30

आतापर्यंत देशात कोरोनाचे एकूण तीन कोटी 37 लाख 89 हजार 549 रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी चार लाख 48 हजार 817 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Coronavirus 22842 new coronavirus cases and 244 deaths in india in last 24 hours | CoronaVirus Updates: देशात पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ; 24 तासांत 22 हजार 842 नवे रुग्ण, लसीकरणाचा आकडा 90 कोटी पार

CoronaVirus Updates: देशात पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ; 24 तासांत 22 हजार 842 नवे रुग्ण, लसीकरणाचा आकडा 90 कोटी पार

Next


नवी दिल्ली - देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 22 हजार 842 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर, 244 जणांचा मृत्यू झाला आहे. (22842 new coronavirus cases and 244 deaths in india in last 24 hours)

आतापर्यंत 4 लाख 48 हजार 817 जणांचा मृत्यू -
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्ण संख्या 2 लाख 70 हजार 557 वर आली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात कोरोनाचे एकूण तीन कोटी 37 लाख 89 हजार 549 रुग्ण समोर आले आहेत. यांपैकी चार लाख 48 हजार 817 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

लसीकरणाचा आकडा 90 कोटींच्या पुढे -
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, देशात लसीकरणाचा आकडा 90 कोटींच्या पुढे गेला आहे. काल कोरोना व्हायरस लसीचे 73 लाख 76 हजार 846 डोस देण्यात आले. यानंतर एकूण लसीकरणाचा आकडा आता 90 कोटी 51 लाख 75 हजार 348 वर पोहोचला आहे.

केरळमध्ये 13,834 नव्या रुग्णांची नोंद - 
देशातील राज्यांचा विचार करता, इतर राज्यांच्या तुलनेत केरळमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. केरळमध्ये गेल्या 24 तासांत 13 हजार 217 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 121 लोकांचा मृत्यू झाला. काल 14 हजार 437 लोकांनी कोरोनावर मात केली. आता केरळमध्ये एकूण सक्रिय रुग्णांची संख्या एक लाख 41 हजार 155 एवढी आहे. याचबरोबर राज्यात आतापर्यंत 25 हजार 303 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Coronavirus 22842 new coronavirus cases and 244 deaths in india in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.