coronavirus: केरळात एकाच दिवसात आढळले ९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, मुख्यमंत्री विजयन यांचा माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 07:00 PM2020-03-25T19:00:54+5:302020-03-25T19:02:05+5:30
देशातील बहुतांश राज्यांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
रांची - राज्यात कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढत चाललं असून, रुग्णांची संख्यादेखील ११६ वरून १२२वर गेली आहे. आज सकाळी सांगली येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्य संसर्गातून बाधित आढळून आले आहेत. मुंबईतल्या ४ जणांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच मुंबईत नव्याने ५ आणि ठाणे येथे १ रुग्ण असे सहा रुग्ण आढळून आले आहेत. तर केरळ राज्यातही आज दिवसभरात ९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. केरळचेमुख्यमंत्री पनराई विजय यांनी याबाबत माहिती दिली.
कोरोना विषाणूनं भारतात थैमान घातलं असून, बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५६०वर गेली असून, आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४६ जणांची या जीवघेण्या रोगातून सुखरूप मुक्तता झाली आहे. महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या १०७वर गेली असून, केरळमध्ये कोरोनानं बाधित झालेले १०५ रुग्ण समोर आले आहेत. विशेष म्हणजे या कोरोनाग्रस्तांमध्ये ४१ विदेशी नागरिकांचा समावेश आहे.
देशातील बहुतांश राज्यांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा आकडा १२२ वर पोहचला आहे. तर, त्याखालोखाल केरळमध्ये ११८ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. केरळमध्ये आज ९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये, दुबईहून आलेल्या रुग्णांची संख्या ४ आहे, एकजण लंडनरिटर्न आहे, तर १ जण फ्रान्सवरुन मायदेशी परतला आहे. त्यासोबतच तिघे स्थानिकच आहेत, असे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगतिले. या नवीन ९ कोरोनाबाधित रुग्णांसह केरळमधील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ११८ वर पोहोचली आहे, असेही ते म्हणाले.
There have been 9 new #COVID19 positive cases in Kerala today; 4 of them returned from Dubai, 1 from UK and 1 from France. The total number of COVID-19 cases rises to 118 in the state: Pinarayi Vijayan, Chief Minister of Kerala. (File pic) pic.twitter.com/K3jF3LcbCh
— ANI (@ANI) March 25, 2020
दरम्यान, राज्यात मुंबई शहर आणि उपनगर ४१, पिंपरी चिंचवड १२, पुणे १९, नवी मुंबई ५, कल्याण ५, नागपूर ४, यवतमाळ ४, सांगली ४, अहमदनगर ३, ठाणे ३, सातारा २, पनवेल १, उल्हासनगर १, औरंगाबाद १, रत्नागिरी १, वसई-विरार १ अशा रुग्णांचा समावेश आहे. राज्यात मंगळवारी कोरोनाबाधितांचा आकडा १०७ वर पोहोचला होता, तो आज १२२ वर आहे. एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत असताना रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदी पालिकेचे कर्मचारी, अधिकारी रुग्ण बरे कसे होतील यासाठी प्रयत्न करत आहेत. पालिकेकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना चांगलेच यश आले आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाची लागण झालेल्या १२ रुग्णांना बरे करण्यात आले आहे. त्यांच्या चाचण्यांमध्ये ते कोरोना निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य विभागाला रुग्णांना बरे करण्यात यश आले आहे. केंद्र आणि राज्य सरकाराच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या १५ रुग्णांना लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे.