नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना सोमवारी दिलासादायक बातमी समोर आली. देशात आतापर्यंत ८५७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर कोरोनामुळे ३०८ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका दिवसात १४१ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. देशभरातील १५ राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये मागील १४ दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. या २५ जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. मात्र यानंतर आता चिंता वाढवणारी एक बाब समोर आली आहे. दिल्लीमध्ये एका दिवसात कोरोनाचे ३५६ रुग्ण आढळले असून देशीतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून ९००० च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिल्ली सरकारने दिलेल्या माहितीनुसार, २४ तासांत तब्बल कोरोनाचे ३५६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. एका दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही १५१० इतकी झाली आहे. यापैकी १०७१ रुग्ण हे तबलिगी जमात मरकजशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या १४ तासांत दिल्लीत कोरोनाने ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीतील एकूण २८ जणांनी जीव गमावला. ३० जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केलं होतं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. १४ दिवसानंतरही या २५ जिल्ह्यात कोरोना रुग्ण न आढळल्याने हे जिल्हे कोरोनाविरुद्ध लढाई जिंकले आहेत. यापुढेही या जिल्ह्यात नवीन रुग्ण आढळता कामा नये यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, जेव्हा या जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते तेव्हा जिल्हा प्रशासनाने कंटेनमेंट स्ट्रैटिजी धर्तीवर काम केले होते. ज्याचा चांगला परिणाम आता समोर आला आहे. पण आपल्याला यापुढेही अशाप्रकारचे ऊर्जेने काम करायला लागणार आहे. आगामी काळातही या जिल्ह्यांमध्ये नवीन रुग्ण आढळणार नाही याची काळजी घेतली जाईल असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
जनतेला सवलती मिळण्याच्या शक्यता, आजच्या भाषणाकडे देशाचे लक्ष
खासगी कोरोना चाचण्या आता फक्त गरिबांसाठीच, न्यायालयाचा नवा आदेश