नवी दिल्ली : देशातील चार प्रतिष्ठित संस्थांनी मे महिन्याच्या मध्यापर्यंत भारतातील कोरोनाचे चित्र कसे असेल, याचा विज्ञाननिष्ठ सांख्यिकी मॉडेलच्या आधारे अभ्यास करून संभाव्य भयावह चित्र दाखविणारा एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार येत्या ३ मे रोजी देशव्यापी ‘लॉकडाऊन’ उठवल्यानंतर दोन आठवड्यांत देशातील कोरोना मृतांचा आकडा सध्याच्या ६५२ वरून ३८,२०० वर तर कोरोनाबाधितांचा आकडा ३० लाखांच्या घरात पोहोचू शकेल, असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.दिल्लीतील ‘जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च, बंगळुरू येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’, मुंबईतील ‘आयआयटी’ आणि पुण्यातील ‘आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज या संस्थांनी मिळून हा अभ्यास अहवाल तयार केला आहे. ‘कोविड-१९ मेड इन्व्हेंट्री’ या सांख्यिकी मॉडेलच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजयराघवन यांच्या मदतीने हा अभ्यास केला गेला.अतिरंजीत व भयावह चित्र दाखवून घबराट निर्माण करणे, हा या अभ्यासामागचा हेतू नाही, तर शक्य ते सर्व प्रयत्न करूनही वाईटात वाईट काय परिस्थिती उद्भवू शकते व तसे झाले तर ती स्थिती हाताळण्यासाठी वैद्यकीय सोयी-सुविधांची किती सज्जता ठेवावी लागेल याचा वस्तुनिष्ठ अंदाज यावा यासाठी हा विज्ञाननिष्ठ अभ्यास केला गेला आहे.इटली आणि न्यूयॉर्क राज्यात अशाच सांख्यिकी मॉडेलच्या आधारे केलेला अंदाज बऱ्याच अंशी बरोरबर ठरला होता, असे या अभ्यासकांचे म्हणणे आहे.जवाहरलाल नेहरू संस्थेचे सहयोगी प्राध्यापक संतोष अंशुमाली म्हणाले की, आताच्या आकडेवारीचा विचार करून या मॉडेलने अंदाज केला तर १९ मेपर्यंत देशातील कोरोनामृत्यू ३८ हजारांच्या पुढे जातील, असे दिसते. जसजशी आकडेवारी बदत जाईल तसा या अंदाजे संख्येतही बदल होऊ शकेल. अभ्यासाचा मुख्य उद्देश वैद्यकीय सोयी-सुविधांच्या सज्जतेची तयारी करणे हा असल्याने या मॉडेलमध्ये संभाव्य आकडे थोडे जास्त येतील, असे गृहीत धरण्यात आले आहे.या मॉडेलने २८ एप्रिल ते १९ मे या चार आठवड्यांसाठीचे संभाव्य चित्र कसे असेल, याचा अंदाज काढण्यात आला आहे. त्यानुसार संभाव्य कोरोनामृत्यूची संख्या या काळात अशी वाढू शकेल, असे दिसते : पहिला आठवडा (२८ एप्रिल) १,०१२. दुसरा आठवडा (५ मे) ३,२५८. तिसरा आठवडा (१२ मे) १०,९२४ व चौथा आठवडा (१९ मे) ३८,२२०. जसजशी नवी आकडेवारी येईल तसे यात अनुरूप बदल करण्याची मॉडेलमध्ये सोय आहे.माहितीचा घेतला आधारडॉक्टर, अन्य वैद्यकीय कर्मचारी, पीपीई, व्हेंटिलेटर, आॅक्सिजन, मास्क वगैरेंची जिल्हानिहाय संभाव्य गरज किती असू शकेल, याचा अंदाज करण्यासाठी या मॉडेलमध्ये ‘पॉझिटिव्ह’ चाचणी अहवाल आलेल्या रुग्णांचा आकडा न घेता अधिक विश्वसनीय असलेला मृत्यूचा आकडा आधार मानला गेला आहे.यातील संभाव्य आकडेवारी साथीचा रोख असाच राहिला तर नजीकच्या भविष्यात काय चित्र असू शकेल, याचा केवळ संख्याशास्त्राच्या आधारे काढलेला अंदाज आहे. प्रत्यक्षात तसे होईलच, असा हा दावा नाही, असे या अभ्यास अहवालात नमूद केले गेले आहे.काही प्रमुख अंदाज व संभाव्य गरजआयसीयूमधील रुग्ण ७६,४४०दक्षता घ्यावे लागणारे रुग्ण ४,५८,६३७दुय्यम सेवा लागणारे रुग्ण २४,४६,०६४संभाव्य कोरानामृत्यू ३८,२२०फक्त कोरोनासाठी राखीव२० खाटांची आरोग्य केंद्रे २२,९३२फक्त कोरोनासाठी राखीव१० खाटांची इस्पितळे ७,६४४डॉक्टर १,५२,९८०नर्स व इतर आरोग्य कर्मचारी ४,८९,२१६व्हेंटिलेटर ५३.५०८़इन्फ्यूजन पंप ३.०५,७६०फूल पीपीई ५,५८,६४०पीपीई ७६,४४०
CoronaVirus: मेच्या मध्यात देशातील मृतांचा आकडा ३८ हजारांवर जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 4:10 AM