नवी दिल्ली : देशभरात गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांचा आकडा ७२ हजार ३३० वर पोहोचला. ११ ऑक्टोबर २०२० रोजीनंतर प्रथमच एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात बाधितांची नोंद झाली आहे. ४५९ बाधितांचा मृत्यू गेल्या २४ तासांत झाला असून ११६ दिवसांतला हा उच्चांक आहे. ही आकडेवारी पाहता, देशात दर मिनिटाला ५० पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याचे दिसते. एकीकडे बाधितांची संख्या वाढत असताना ४५ वर्षांपुढील व्यक्तींच्या लसीकरणाला १ एप्रिलपासून सुरुवात झाली. बाधितांची संख्या सतत वाढण्याचा गुरुवारी सलग २२वा दिवस होता.
मुंबईत एका महिन्यात ४७५ टक्क्यांनी वाढ फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात मुंबईमध्ये तब्बल ४७५ टक्क्यांनी बाधितांमध्ये वाढ झाली. मार्चमध्ये मुंबईत ८८ हजार ७१० बाधितांची नोंद झाली. जानेवारी आणि फेब्रुवारीत हीच संख्या अनुक्रमे १८ हजार ३५९ आणि १६ हजार ३२८ अशी होती.