नवी दिल्ली : देशात लॉकडाऊन करूनही कोरोनाचे रुग्ण वाढण्याचा वेग वाढला आहे. दररोज येणारे आकडे सरकारसह नागरिकांच्या मनात धडकी भरवणारे आहेत. आज गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९९८३ नवीन रुग्ण सापडले आहेत. म्हणजे १० हजार रुग्ण व्हायला केवळ १७ रुग्ण कमी आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे गेल्या ५ दिवसांत जवळपास ५०००० नवीन रुग्ण आढळले आहेत.
तीन जूनला देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा जवळपास २ लाख ७ हजार ६१५ होता. जो ४ जूनला वाढून २.१६ लाख झाला. तर ५ जूनला २.२६ वर गेला. ६ जूनला हा आकडा २.३६ लाख आणि ७ जूनला हा आकडा २.४६ लाखांवर गेला. जरी १०००० चा आकडा दररोज पार केला नसला तरीही सरासरी ही ९५०० च्या वर राहिल्याने आता दुपारपर्यंतचा आकडा हा एकूण ५०००० च्या आसपास गेला आहे. आज गेल्या २४ तासांत ९९८३ नवीन रुग्ण सापडले आहेत. यामुळे आजचा आतापर्यंतचा आकडा २ लाख ५६ हजार ६११ एवढा झाला आहे.
देशात कोरोनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारीला समोर आला होता. तर ७ मे रोजी कोरोना रुग्णांचा आकडा ५०००० पार झाला होता. म्हणजेच पहिला ५०००० चा टप्पा ओलांडण्यासाठी ९६ दिवस लागले होते. यामध्ये लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र, १९ मे ला कोरोना रुग्णांचा आकडा १ लाखांवर गेला होता. हा वेग दिवसागणिक कमालीचा वाढत गेला आणि २७ मे रोजी हा आकडा १.५० लाखांवर पोहोचला. ३ जूनला ही संख्या दोन लाखांवर गेली होती.
देशभरात एकूण रुग्णांचा आकडा २ लाख ५६ हजार ६११ आहे. यामध्ये ७ हजार १३५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख २४ हजार ९५ जण बरे झाले आहेत. म्हणजेच सध्या १ लाख २५ हजार ३८१ रुग्ण उपचार घेत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
प्रशिक्षण विमान कोसळले; दोघांचा मृत्यू
Very IMP! होम लोनच्या स्टेटसमध्ये मोठे बदल; बँकेत एकदा जरूर चेक करा
Unlock 1: कोरोनाच्या दहशतीत कार्यालये उघडण्याचा पहिला दिवस; मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी
Unlock 1: डोंबिवलीत कामावर जाण्यासाठी भल्यामोठ्या रांगा; पण वाहनेच नाहीत
UnlockDown 1: लॉकडाऊन उघडताच योगी आदित्यनाथांनी केले 'हे' काम