नवी दिल्ली - गेल्या काही दिवासांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येने शुक्रवादी नवा उच्चांक गाठला आहे. शुक्रवारी एकाच दिवसांत कोरोनाचे सहा हजार ६५४ नवे रुग्ण सापडल्याने देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाख २५ हजार १०१ झाली आहे. दरम्यान, देशात कोरोनामुळे मृत्य झालेल्यांची संख्या ३ हजार ७२० पर्यंत पोहोचली आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत ५१ हजार ७८४ कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर सध्या देशात कोरोनाचे ६९ हजार ५९७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
गेल्या २४ तासांत देशभरात १३७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची संख्या ३ हजार ७२० पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्याचे आव्हान अधिकाधिक खडतर होत चालले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ४४ हजार ५८२ एवढी झाली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक असली तरी इथल्या रुग्णांचा मृत्यूदर हा पश्चिम बंगाल (८.४०), गुजरात (५.९९) आणि मध्य प्रदेश (४.५१) या राज्यांपेक्षा कमी आहे. जगात बाधितांचा मृत्यूदर ६.६१ टक्के असताना महाराष्ट्रात मात्र तो ३.४९ इतका आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोरोनाचा एकही रुग्ण न सापडलेल्या या राज्यात १५ जूनपासून सुरू होणार शाळा-कॉलेज
लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती
रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष
कोलकाता विमानतळ पाण्याखाली, वादळी वाऱ्यांनी महाकाय विमानेही हादरलीकोरोनाबाधितांच्या संख्येने शुक्रवारी नवा उच्चांक गाठला. दिवसभरात २ हजार ९४० नव्या रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ४४ हजार ५८२ झाली आहे, तर एका दिवसात ८५७ लोक बरे झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या १२ हजार ५८३ इतकी झाली आहे. दिवसभरात कोरोनामुळे ६३ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण मृतांची संख्या १ हजार ५१७ इतकी झाली आहे.देशातील ३३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी १० ठिकाणी एकाही मृत्यूची नोंद नाही, तर ८ ठिकाणी मृतांची संख्या १० पेक्षा कमी आहे. त्यामुळे देशातील मृत्यूदर ३.०२ इतका आहे.