शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

coronavirus: ६२ टक्के पालक मुलांना शाळेत पाठवण्यास अनुत्सुक, तर केवळ ३६ टक्के लोक लोकल प्रवासास तयार - सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 12:26 AM

, देशातील अनलॉकचे तीन टप्पे संपून चौथा टप्पा सुरू होण्याची वेळ जवळ आली तरी लोक पूर्वीप्रमाणे घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.

ठळक मुद्देअनलॉक-४ च्या टप्प्यात देशातील विविध महानगरांमधील लोकल आणि मेट्रो सेवा तसेच शाळा सुरू करण्याबाबत विचार अद्यापही बहुतांश लोक हे लोकल किंवा मेट्रोने प्रवास करण्यास तसेच मुलांना शाळेत पाठवण्यास अनुत्सुक अनलॉक ४ ला १ सप्टेंबरपासून सुरू होणार

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात निर्माण झालेली चिंताजनक परिस्थितीती अद्यापही कायम आहे. या साथीमुळे दररोज देशभरात ५० हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. दरम्यान, देशातील अनलॉकचे तीन टप्पे संपून चौथा टप्पा सुरू होण्याची वेळ जवळ आली तरी लोक पूर्वीप्रमाणे घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. अनलॉक-४ च्या टप्प्यात देशातील विविध महानगरांमधील लोकल आणि मेट्रो सेवा तसेच शाळा सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे. मात्र अद्यापही बहुतांश लोक हे लोकल किंवा मेट्रोने प्रवास करण्यास तसेच मुलांना शाळेत पाठवण्यास अनुत्सुक असल्याचे समोर आले आहे.लोकल सर्कल्सने केलेल्या सर्वेनुसार ६२ टक्के पालकांनी आपण अद्यापही आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नसल्याचे सांगितले. तसेच केवळ सहा टक्के लोकांना पुढच्या दोन महिन्यांत आपण चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जाण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. कोरोनाच्या संसर्गाची भीती एवढी आहे की, त्यामुळे ९४ टक्के लोकांनी पुढच्या दोन महिन्यांनंतरसुद्धा चित्रपटगृहात जाण्यास तयार नसल्याचे सांगितले.या सर्वेमधून लोकल तसेच मेट्रो प्रवासाबाबतही लोकांचा कल जाणून घेण्यात आला. त्यामध्ये सुमारे ६४ टक्के लोकांनी आपण दोन महिन्यांनंतरसुद्धा मेट्रो किंवा लोकलने प्रवास करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगितले. तर केवळ ३६ टक्के लोकांनी मेट्रो किंवा लोकलने प्रवास करण्याची आपली तयारी असल्याचे सांगितले.देशात सध्या अनलॉक ३ सुरू असून, अनलॉक ४ ला १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र केंद्र सरकारने अनलॉक ४ साठीची नियमावली जारी केलेली नाही. दरम्यान, या सर्व्हेमध्ये २६१ जिल्ह्यांमधील २५ हजार लोकांचा कल जाणून घेण्यात आला होता. यामध्ये ६४ टक्के पुरुष आणि ३६ टक्के महिलांचा समावेश होता. यामध्ये १ सप्टेंबरपासून लोकलसेवा सुरू झाल्यास तुम्ही ६० दिवसांनंतर प्रवास करणार का, असा प्रश्न विचारला असता ३६ टक्के लोकांनी होकारार्थी उत्तर दिले. तर ५१ टक्के लोकांनी नकारार्थी उत्तर दिले. उर्वरित १३ टक्के लोकांनी याबाबत काही निश्चितपणे सांगता येणार नसल्याचे सांगितले.   

इतर महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार झालंय खास एअर इंडिया वन विमान, अशी आहेत वैशिष्ट्ये

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकMumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेSchoolशाळा