नवी दिल्ली : जगभरातील ५० देशांमध्ये सुमारे ६,३०० नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे व त्यापैकी ४० जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली. विदेशांमधील कोरोनाबाधित भारतीय नागरिकाची संख्या १६ एप्रिल रोजी ३३६ होती. त्यानंतरच्या आठ−दहा दिवसांत ही संख्या दुपटीने वाढली. याच काळात मृत्यूसंख्याही २५ वरून ४० वर गेली. विदेशांमधील सुमारे ९० टक्के कोरोनाबाधित भारतीय नागरिक सिंगापूर व आखाती देशांमध्ये आहेत. सिंगापूरमध्ये प्रामुख्याने डॉमिटरीमध्ये राहणाऱ्या एक हजार भारतीय कामगारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कुवेत, बहारिन, ओमान, कतार, सौदी अरबस्तान व संयुक्त अरब अमिरात यासारख्या आखाती देशांमध्ये एक हजार भारतीयांना संसर्ग झाला आहे. इराणमध्येही कोरोना संसर्ग झालेल्या भारतीयांची संख्या शंभरहून अधिक आहे. या सर्व भारतीयांना योग्य उपचार व अन्य सुविधा मिळतील याकडे त्या− त्या देशांमधील भारतीय वकिलाती लक्ष देत आहेत. परंतु भारतातच कोरोनाला परिणामकारकपणे आळा घालणे अद्याप शक्य झालेले नसल्याने परदेशातील या कोरोनाग्रस्त भारतीयांना मायदेशी परत आणणे के व्हा शक्य होईल, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. तीन भारतीयांचे मृतदेह दिल्लीहून परत पाठविले.आबुधाबी : कोरोनाखेरीज अन्य आजारांनी मृत्यू पावलेल्या तीन भारतीय नागरिकांचे मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातींच्या सरकारने नवी दिल्लीला पाठविले असता ते तेथून परत पाठविण्यात आल्याचे वृत्त ‘गल्फ न्यूज’ या वृत्तपत्राने दिले आहे. त्या वृत्तात त्या मृत भारतीयांची नावे कमलेश भट, संजीव कुमार व जगसीर सिंग अशी देण्यात आली. कमलेश यांचे १७ एप्रिल रोजी तर अन्य दोघांचे १३ एप्रिल रोजी निधन झाले होते.गल्फ न्यूज’ने यासंदर्भात भारताचे येथील राजदूत पवन कपूर यांच्याशी संपर्क साधला तेव्हा कपूर म्हणाले की, ही घटना नक्कीच धक्कादायक असून, सुन्न करणारी आहे. आम्ही कोरोनामुळे मृत्यू झालेल्या भारतीयांचे मृतदेह मायदेशी पाठवत नाही. तरी हे मृतदेह परत का पाठविले हे नक्की कळत नाही. आम्ही नेमके कशामुळे असे झाले याची माहिती घेत आहोत. कदाचित कोरोनामुळे विमानतळांवर लागू असलेल्या निर्बंधांमुळे असे झाले असावे.>इस्कॉनच्या ३१ जणांना कोरोनाची बाधाबांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका येथील इस्कॉनच्या ३१ सदस्यांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याने प्रशासनाने या जीवघेण्या विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी इस्कॉन मंदिर पूर्णत: बंद केले आहे. बांगलादेशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जवळपास ५ हजारअसून, आतापर्यंत १४० जणांचा या रोगाने मृत्यू झाला आहे. ढाकामधील स्वामीबाग परिसरात इस्कॉन आश्रम आहे. येथील ३१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, असे गेंदरिया पोलीस ठाण्याचे अधिक री सजूमियाँ यांनी ढाक ट्रिब्युनच्या हवाल्याने सांगितले. कोरोनाबाधित इस्कॉनच्या सदस्यांना उपचारासाठी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील सर्व रस्ते बंद केले आहे. बांगलादेशात ८ मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता, तेव्हापासून हे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते.
CoronaVirus: ५० देशांत ६,३०० भारतीय नागरिकांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 5:27 AM