बस्ती : केंद्र सरकारने लॉकडाऊन तिसऱ्यांदा वाढविण्याआधी राज्यांतर्गत मजुरांच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे त्या त्या राज्यांनी अडकलेल्या मजुरांना आपल्या राज्यात नेण्यासाठी बसेस पाठविल्या आहेत. काही ठिकाणी ट्रेनही सोडण्यात आल्या आहेत. अशाच काही मजुरांना उत्तर प्रदेशने बसने जिल्ह्यात नेले. यापैकी ७ जणांना कोरोना झाल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्याने आता राज्यांचे धाबे दणाणले आहेत.
केंद्र सरकारने परवानगी दिल्याने राज्यांनी परराज्यात अडकलेले विद्यार्थी, पर्यटक, मजूर यांना नेण्यासाठी सरकारी बसेस सोडल्या होत्या. उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यामध्येही काही मजुरांना महाराष्ट्रातून नेण्यात आले होते. जिल्हाधिकारी आशुतोष निरंजन यांच्यानुसार कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले हे ७ मजूर महाराष्ट्रातून सरकारी बसमधून आणण्यात आले होते. त्यांना हरैया भागातील सरकारी सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
नाशिकवरून उत्तरप्रदेशला जाणाऱ्या मजुरांसाठी आज स्पेशल ट्रेन सोडण्यात आली. ही ट्रेन रविवारी लखनऊला पोहोचणार आहे. बस्तीमधील प्रकरणामुळे आता या मजुरांनाही कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता वाढल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एकूण २३३८ रुग्ण सापडले असून ४२ जणांचा मृत्यू झाला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुंबई, पुणेकरांना परवानगी नाहीच! जिल्हांतर्गत प्रवासाला पोलिसांकडून नकार
CoronaVirus चिंताजनक! राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताच; आज ३६ जणांचा मृत्यू
CoronaVirus दिलासादायक! गेल्या दोन दिवसांत धारावीत एकही मृत्यू नाही; पण...
जनधन खात्यांमध्ये 4 मेपासून पैसे जमा होणार; पण काढण्यासाठी अनोखा नियम
IFSC केंद्र नेमके आहे तरी काय? गिफ्ट सिटीचा मालक कोण? जाणून घ्या...