इटावा - भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत 775 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही 24,000 वर पोहोचली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंग यासारखे खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशातील इटावामध्ये एक भयंकर घटना घडल्याची माहिती मिळत आहे. तब्बल 70 कोरोनाग्रस्त तीन तास रस्त्यावर फिरत असल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथून जवळपास 70 रुग्णांना बसने उत्तर प्रदेशच्या सैफई येथील रुग्णालयात पाठवलं होतं. मात्र उत्तर प्रदेशातील ज्या रुग्णालयात पाठवण्यात आलं होतं. त्या रुग्णालयाचं गेटचं बंद होतं. त्यामुळे सर्व रुग्णांना तब्बल तीन तास गेटबाहेर वाट पाहत बसावे लागले. रुग्णांना रुग्णालयात प्रवेश मिळाला नसल्याने ते रस्त्यावर फिरत होते.
स्थानिक लोकांनी कोरोनाग्रस्त रस्त्यावर फिरत असल्याचं पाहिलं आणि तातडीने पोलीस आणि प्रशासनाला याबाबत माहिती दिली. रुग्णांच्या बाबत योग्य ती माहिती न मिळाल्याने असं घडलं असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे. तब्बल तीन तासांनी कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात प्रवेश मिळाला. तसेच घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यावर त्यांनी कोरोनाग्रस्तांना रस्त्यावर फिरू नका, इतरांना त्याची लागण होईल असं सांगितलं. या घटनेचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. मात्र तरीही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. जगभरात कोरोनाने थैमान घातलं असून कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 197,400 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कोरोनाग्रस्तांची संख्या 28 लाखांवर पोहोचली आहे. अमेरिका, इटली, स्पेनमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थती निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कोरोना संकटात अमेरिकेत भारतीय मुलीची कमाल, अनेकांच्या चेहऱ्यावर फुलवतेय हास्य
Coronavirus : अर्थव्यवस्थेची चाके पुन्हा सुरू करता येतील; बिल गेट्स यांनी दिले 'हे' मोलाचे सल्ले
Coronavirus : ... तर मे महिन्याच्या शेवटी तब्बल 4 कोटी भारतीयांकडे मोबाईलच नसेल
Coronavirus : लग्नाचा वाढदिवस पण ड्युटी फर्स्ट, 'या' डॉक्टर दाम्पत्याचं तुम्हीही कराल भरभरून कौतुक
Coronavirus : कर्तव्यनिष्ठेला सलाम! वर्दीसह आईचीही जबाबदारी चोख पार पाडतेय 'ही' कोरोना योद्धा
Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा