नवी दिल्ली : देशात ९०.५८ लाख लोक कोरोनामुक्त झाले असून त्यांचे प्रमाण ९४.२८ टक्के आहे. शनिवारी कोरोनाचे आणखी ३६,६५२ रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या ९६ लाखांवर पोहोचली आहे. या रुग्णांचा मृत्यूदर अवघा १.४५ टक्के आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी या संसर्गाने आणखी ५१२ जण मरण पावले. त्यामुळे बळींची एकूण संख्या १,३९,७०० झाली आहे. देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ९६,०८,२११ असून बरे झालेल्यांचा आकडा ९०,५८,८२२ आहे. देशात कोरोनाचे ४,०९,६८९ सक्रिय रुग्ण असून त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ४.२६ टक्के आहे.
अमेरिकेमध्ये पुन्हा एका दिवसात २ लाख रुग्णअमेरिकेमध्ये सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कोरोनाचे २ लाखांहून अधिक रुग्ण आढळले. त्यांची नेमकी संख्या २२५,२०१ होती. एकाच दिवसात २ लाखांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळण्याची घटना अमेरिकेत गेल्या महिनाभरात तीनदा घडली. साथीच्या वाढत्या फैलावामुळे अमेरिकेत पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे.