नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असून रुग्णांच्या संख्येत अतिशय झपाट्यानं वाढ होत आहे. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष कोरोनावरील लसीकडे लागलं आहे. यामध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठानं मोठी आघाडी घेतली आहे. ऑक्सफर्डनं लसीच्या उत्पादनासाठी भारतातल्या सीरम इन्स्टिट्यूटसोबत करार केला आहे. त्यामुळे ऑक्सफर्डच्या लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यास नंतरच्या घडामोडींमध्ये सीरमची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. त्याच पार्श्वभूमीवर सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पुनावाला यांना एक प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाला पुनावाला यांनी भन्नाट उत्तर दिलं आहे.कोरोनावरील लसीचं उत्पादन केल्यानंतर पारशी समुदायाचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसींचा विशेष कोटा राखीव ठेवणार का, असा प्रश्न स्वदेश फाऊंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून अतिशय गमतीनं विचारला. स्क्रूवाला यांच्या प्रश्नाला पूनावाला यांनी अतिशय मजेशीर उत्तर दिलं. आम्ही एकाच दिवसात लसींचं इतकं उत्पादन करू की संपूर्ण जगभरातला पारशी समाज सुरक्षित होईल, अशा शब्दांत पुनावाला यांनी स्क्रूवाला यांच्या ट्विटला रिप्लाय दिला.
Yes, @RonnieScrewvala, we will keep more than enough for the community. Our production capacity of just one day will be enough tपारशी समाजाबद्दल स्क्रूवाला यांनी उपस्थित केलेली चिंता आणि त्याला पुनावाला यांनी दिलेलं उत्तर याचं पारशी समाजाकडून कौतुक होत आहे. पुनावाला यांच्या ट्विटला उत्तर देताना अनेकांनी त्यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. पारशी आणि पुनावाला दोघेही पारशी समाजाचे आहेत.ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेका यांनी तयार केलेल्या कोरोनावरील लसीच्या मानवी चाचणीसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं डीजीसीआयकडे परवानगी मागितली आहे. देशातील सुदृढ व्यक्तींवर कोरोशील्ड लसीची चाचणी घेण्याची परवानगी देण्यात यावी, यासाठी सीरमनं अर्ज केला आहे. सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यास दर महिन्याला ६ ते ७ कोटी डोस तयार करू, असा विश्वास पुनावाला यांनी व्यक्त केला आहे.