CoronaVirus: जनता कर्फ्यूमध्ये दुकान उघडले म्हणून ADM ने कानशिलात लगावली; मध्य प्रदेशातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 03:46 PM2021-05-24T15:46:03+5:302021-05-24T15:48:30+5:30

CoronaVirus: छत्तीसगडनंतर आता मध्य प्रदेशातील शाजापूर येथे अपर जिल्हाधिकारी असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने कर्फ्यू कालावधीत दुकान सुरू ठेवल्यामुळे कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे.

coronavirus adm manjusha roy slaps a boy over opening shoe shop amid lockdown in mp | CoronaVirus: जनता कर्फ्यूमध्ये दुकान उघडले म्हणून ADM ने कानशिलात लगावली; मध्य प्रदेशातील घटना

CoronaVirus: जनता कर्फ्यूमध्ये दुकान उघडले म्हणून ADM ने कानशिलात लगावली; मध्य प्रदेशातील घटना

Next
ठळक मुद्देजनता कर्फ्यूमध्ये दुकान उघडले म्हणून ADM ने कानशिलात लगावलीछत्तीसगडनंतर मध्य प्रदेशातील घटनाघटनेचा व्हिडिओ व्हायरल

भोपाळ: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाला मोठा तडाखा दिला. हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्या घटत असली, तरी मृत्यूचे वाढते प्रमाण चिंतेत भर घालत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी अनेक निर्बंधांसह जनता कर्फ्यू किंवा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. मात्र, अनेक ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचे पाहायला मिळते. छत्तीसगडनंतर आता मध्य प्रदेशातील शाजापूर येथे अपर जिल्हाधिकारी असलेल्या एका महिला अधिकाऱ्याने कर्फ्यू कालावधीत दुकान सुरू ठेवल्यामुळे कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. (coronavirus adm manjusha roy slaps a boy over opening shoe shop amid lockdown in mp)

मध्य प्रदेशातील मालवा परिसरातील शाजापूर भागात एका मुलांने कर्फ्यू कालावधी लागू असताना चपलांचे दुकान सुरू ठेवले होते. मात्र, अपर जिल्हाधिकारी असलेल्या मंजुषा विक्रांत रॉय या महिला अधिकाऱ्याने या मुलाच्या थोबाडित मारली. या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. 

काय घडले नेमके?

अपर जिल्हाधिकारी मंजुषा रॉय शाजापूर भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत होत्या. नियम पाळले जात नसल्याचे पाहून आधीच त्यांना खूप राग आला होता. त्यातच एका मुलाने जनता कर्फ्यू कालावधीत चपलांचे दुकान खुले ठेवल्याचे त्यांनी पाहिले. यानंतर राग अनावर झाल्याने या अधिकाऱ्याने त्या मुलाच्या कानशिलात लगावल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. 

तुमचे प्रयत्न अपुरे, आम्ही समाधानी नाही; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला सुनावले

काय आहे व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये महिला अधिकारी त्या मुलावर रागावताना दिसत आहे. सोबत पोलिसांची फौज असून, दुकान बंद करण्याची कारवाई पोलीस करताना पाहायला मिळत आहेत. मात्र, मध्येच महिला अधिकाऱ्याने त्या मुलाच्या कानशिलात लगावल्याचे पाहायला मिळत आहे. या मुलाचे म्हणणे होते की, घरातच त्याचे दुकान आहे. यानंतर प्रशासनाने हे दुकान सील केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर अपर जिल्हाधिकारी मंजुषा रॉय यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

दरम्यान, यापूर्वी छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यात लॉकडाऊन लागू असताना जिल्हाधिकाऱ्यांनी एका युवकाला कोरोना नियमांकडे दूर्लक्ष केल्याने कानशिलात लगावल्याचा आणि त्याचा मोबाईल फोडल्याचा प्रकार घडला आहे. यानंतर पोलिसांनीही त्याला मारले. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच आरेरावी करणाऱ्या या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या कृत्यासाठी माफी मागितली.
 

Web Title: coronavirus adm manjusha roy slaps a boy over opening shoe shop amid lockdown in mp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.