जयपूर - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. भारतात सध्याची स्थिती पाहता 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 28,000 च्या वर गेला आहे. तर आतापर्यंत 800 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पंतप्रधानांनी लोकांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्यास सांगितलं आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक उद्योग-धंदे बंद झाले आहेत. तर काही ठिकाणी काम नसल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र गरजू लोकांना अन्न मिळावं यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. मदतीचा हात देत आहेत.
लॉकडाऊनमध्ये अनेक ठिकाणी मोफत रेशन वाटप करण्यात येत आहे. मात्र सिरोहीमधील आदिवासी बांधवांनी स्वयंसेवी संस्थेमार्फत देण्यात येणारं मोफत रेशन नाकारलं आहे. भूक नाही तर स्वाभिमान मोठा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिंगलवा फॉल आणि होक्काफाली गावातील लोकांनी रेशन किट विनामूल्य स्वीकारण्यास नकार दिला आहे. आदिवासींना दया नको आहे तर ते हे धान्य कर्ज म्हणून घेत आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर आपल्या वेतनातून हे कर्ज परतफेड करू असं तेथील ग्रामस्थांनी म्हटलं आहे.
सिरोही येथील वासा गावाचे रहिवासी असलेल्या किसन राम देवासी यांनी लॉकडाऊनमुळे अहमदाबादमधील नोकरी सुटली. आमच्या 9 जणांच्या कुटुंबासमोर अन्नाचं संकट उभं राहिलं. संस्था मदत करतायेत म्हणून दानात काहीही स्वीकारणे आपल्या पूर्वजांच्या शिकण्याच्या विरोधात आहे. पण निराधार प्राण्यांसाठी भाकरी बनवण्याच्या मोबदल्यात रेशन मिळाल्यामुळे माझं कुटुंब आनंदी आहे असं म्हटलंं आहे. तर मजुरी करणाऱ्या वरुजू देवी देखील भटक्या प्राण्यांसाठी दररोज सुमारे 100 पोळ्या बनवतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 207,906 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 30 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 3,014,073 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 888,543 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : 'कोरोना'चे तब्बल 2,07,906 बळी, जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 30 लाखांवर
Coronavirus : दिल्लीत डॉक्टर, नर्ससह तब्बल 170 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
Video : धक्कादायक! VIP ताफ्यासाठी पोलिसांनी थांबवली रुग्णवाहिका
Coronavirus : भारीच! फक्त चेहरा पाहून कोरोनाची माहिती मिळणार, 'हे' उपकरण फायदेशीर ठरणार
Coronavirus : 'मी जिवंत आहे', डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या रुग्णाचा धक्कादायक Video