नवी दिल्ली – अलीकडेच चीनमधून आलेल्या पीपीई किट्सवर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. अतिशय खराब पीपीई किट्स चीनकडून पाठवण्यात आल्या होत्या. फक्त भारतात नाही तर जगातील अन्य देशांनीही चीनच्या पीपीई किट्सची निंदा केली होती. एवढं असताना भारताने पुन्हा एकदा चीनवर भरोसा ठेवून रॅपिड टेस्टिंग किटची मागणी केली आहे.
आता चीनकडून आलेल्या रॅपिड टेस्टिंग किटमध्येही गडबडी असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे चीनने खराब पीपीई किट्स पाठवून सुद्धा पुन्हा रॅपिड टेस्टिंग किट्ससाठी चीनवर भरोसा का ठेवला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर चीनशिवाय दुसरा पर्याय नव्हता तर टेस्टिंगची किट्स तपासणी का केली नाही? असंही सांगण्यात येत आहे. रॅपिड टेस्टिंगची किटमध्ये खराबी असल्याची तक्रार प्रथम राजस्थानने केली. त्यानंतर आयसीएमआरने दोन दिवसांसाठी अँटीबॉडी रॅपिड टेस्टवर बंदी घातली आहे. केवळ राजस्थानमध्येच नव्हे तर अन्य राज्यातही बंदी घालण्यात आली आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने मंगळवारी सर्व राज्यांना दोन दिवसांसाठी अँटीबॉडीची जलद तपासणी थांबवायला सांगितले. आयसीएमआर सध्या या प्रकरणाचा तपास करीत आहे, कारण अनेक राज्यांनी तक्रार दिली आहे की या टेस्टिंग किट्सच्या परिणामानत ६ टक्के ते ७१ टक्के चढ-उतार असल्याचे दिसून येते. त्यामुळे या किट्स अजिबात मान्य नाही आणि किट बदलण्याची आवश्यकता असू शकते असं आयसीएमआरने म्हटलं आहे.
ज्या चीनमधून कोरोना व्हायरस जगभर पसरला होता तो आता वैद्यकीय पुरवठ्यांच्या नावाखाली जगाशी थट्टा करत आहे असा आरोप करण्यात येत आहे. युरोपियन देशांसह अनेक ठिकाणी चीनने अशी निकृष्ट पीपीई किट पाठविली आहेत, जी घालता येणार नाहीत. असे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात चीनने पाठवलेल्या पीपीई किट्स परिधान करताच फाटल्या जात आहेत. चीननेही मास्कच्या नावाखाली लज्जास्पद कृत्यही केले आहे. काही दिवसांपूर्वी चीने अंडरवियरचे बनलेले मास्क आपल्या 'सदाबहार मित्र' पाकिस्तानला पाठवले होते.