आग्रा - देश कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 14,000 हून अधिक झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर मोदी यांनी देशभरात 3 मेपर्यंत संपूर्ण ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
एका भाजीवाल्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. आग्रातील फ्रिगंज भागातील चिम्मन लाल बाडा येथील भाजीविक्रेत्याच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. भाजीवाल्याला कोरोनाची लागण झाल्याने परिसरातील तब्बल 2 हजार नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तसेच या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितनुसार, केजीएमयू रुग्णालयामधून आलेल्या चाचणीत 24 जण पॉझिटिव्ह आढळलेत. यामध्ये एका भाजीवाल्याचा देखील समावेश आहे. आरोग्य विभाग भाजीवाल्याच्या संपर्कात आलेल्यांचा तपास करत आहे. यानंतर संपूर्ण भागात पोलिसांनी गस्त वाढवल्याची माहिती दिली. लॉकडाऊन असतानाही भाजी विक्री सुरू केली होती. यापूर्वी रिक्षा चालवण्याचं काम ते करत होते. पण कमाई होत नसल्याने फळं आणि भाजीपाला विक्री सुरू केली. मार्केटमधून ते भाजीपाला आणत होते.
पाच दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली. यामुळे चाचणी करण्यासाठी ते स्वतःच जिल्हा रुग्णालयात गेले. तिथे त्यांना दाखल करण्यात आलं अशी माहिती भाजीवाल्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉय कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. डिलिव्हरी बॉय पॉझिटिव्ह निघाल्यामुळे येथील तब्बल 72 घरातील लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं. पिझ्झा डिलिव्हरी बॉय मार्चमध्ये काम करत होता. काही दिवसांपूर्वी तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली. याबाबत माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेल्या सर्वांची माहिती मिळवली आणि त्यांना क्वारंटाईन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus: दिलासादायक! ४५ जिल्ह्यांमध्ये नवा रुग्ण नाही
CoronaVirus: ‘ऑक्सफर्ड’ सप्टेंबरअखेरपर्यंत आणणार कोरोनाची लस?