शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
3
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
4
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
5
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
6
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
7
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
8
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
9
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
10
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
11
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
12
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
13
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
14
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
15
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
16
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
17
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
18
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
19
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
20
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी

Coronavirus : 'घरचे आजारी पडले तर...', कुटुंबीयांच्या आठवणीने डॉक्टरचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 4:49 PM

Coronavirus : कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत.

नवी दिल्ली - चीनमध्ये सुरू झालेल्या कोरोनाच्या संसर्गाने आता जगभरात हाहाकार माजवला असून अमेरिका आणि युरोपीयन देशांमध्ये हा आजारा वेगाने पसरत चालला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 4000 वर पोहोचला आहे. तर 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहेत. 

कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच वैद्यकीय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. कोरोनाग्रस्तांवर उपचार करता यावेत यासाठी अनेक जण काही दिवसांपासून आपल्या  कुटुंबापासून लांब आहेत. दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरही कोरोना संसर्गाविरूद्ध लढा देत आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी कुटुंबापासून दूर असलेल्या एम्सच्या डॉ. अंबिका यांनी हे कोविड – 19 विरुद्ध युद्ध असल्याचं सांगितलं आहे. हे सांगताना कुटुंबियांच्या आठवणीने त्या भावुक झाल्या आहेत.

'कोविड – 19 च्या विरोधात हे युद्ध आहे. कुटुंबियांशी फोनवर बोलताना कधीकधी भीती वाटते... आपण घरापासून दूर आहोत. ते जर आजारी पडले तर त्यांच्यावर उपचार करायला जाता येणार नाही, त्यांना भेटता येणार नाही' असं अंबिका यांनी सांगितलं. कुटुंबीयांच्या आठवणीने डॉक्टरचे डोळे पाणावले. तसेच 'असं असतानाही घरच्यांनी कधीच मला घरी ये म्हणून सांगितलं नाही किंवा कोणतीही तक्रार केली नाही. सेवा करत राहा असंच ते मला नेहमी सांगत' असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. 

कोरोनाग्रस्तांवर उपचार करता यावे यासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती नर्सने तब्बल 250 किमीचा प्रवास केल्याची प्रेरणादायी घटना समोर आली आहे. तामिळनाडूमध्ये ही घटना घडली आहे. विनोथिनी असं या 25 वर्षीय नर्सचं नाव असून ती 8 महिन्यांची गर्भवती आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी तिने तामिळनाडूतील तिरुचिरा ते रामनाथुरमपर्यंत तब्बल 250 किमी अंतर प्रवास केला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 75,896 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 13,58,857 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 2,90,643 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : फ्रान्समध्ये कोरोनाचा हाहाकार! 24 तासांत तब्बल 833 जणांचा मृत्यू

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये WhatsApp व्हिडिओ कॉलिंगचा बेस्ट एक्सपीरियन्स हवाय?, मग 'या' ट्रिक्स करा फॉलो 

Coronavirus : सायकलसाठी जमा केलेल्या पैशांचा उपयोग भारी; 'या' चिमुकल्याची बातच न्यारी

Coronavirus : कोरोनाचा असाही फायदा! तब्बल 7 वर्षांनी कुटुंबियांना सापडला बेपत्ता मुलगा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलIndiaभारतDeathमृत्यू