- हरीश गुप्तानवी दिल्ली : महानायक अमिताभ बच्चन यांनी ‘कोरोना’संदर्भात अधिकृत टिष्ट्वटरवर जारी केलेल्या व्हिडिओवरून वादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यांनी व्हिडिओसोबत ‘लॅन्सेट’ अध्ययनाचा निष्कर्षही जोडला. त्यात असे म्हटले आहे की, कोविड-१९ या रोगाचे विषाणू श्वासोच्छ्वासापेक्षा मानवी मलावर (विष्टा) अधिक रेंगाळत असतात. त्यामुळे मल उत्सर्जनामार्फत तोंडावाटे या विषाणूंचा प्रसार होऊ शकतो.मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी लॅन्सेटचा दावा फेटाळल्याने या टष्ट्वीटला नवे वळण लागले. कोविड-१९ या रोगाचा फैलाव फक्त मानवामार्फत होऊ शकतो. माशीद्वारे होत नाही, असे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी लव अग्रवाल हे दररोज कोरोना स्थितीबाबत विभागाला नियमित अधिकृत माहिती देत असतात.लॅन्सेटचे अध्ययन आणि अमिताभ बच्चन यांच्या टष्ट्वीटसंदर्भात विचारले असता त्यांनी स्पष्ट इन्कार करीत स्पष्ट केले की, मानवामार्फतच कोरोना विषाणूंचा प्रसार होतो.टष्ट्वीटमध्ये नेमके काय म्हटले आहे..?कोरोना बाधित व्यक्तींवर उपचार केल्यानंतरही त्याच्या विष्टेत या रोगाचे विषाणू असू शकतात. अशा व्यक्तींच्या विष्टेवर बसलेली माशी खाद्यपदार्थावर बसल्यास कोरोना विषाणंूचा वेगाने प्रसार होईल, असे त्यांनी यात व्हिडिओत म्हटले आहे. ‘भारतीवासीयांनो चला कोरोनाविरुद्ध लढूया. प्रत्येकाने, दररोज आणि नेहमीसाठी शौचालयाचा वापर करावा. दरवाजा बंद तो बिमारी बंद...!’ असे त्यांनी टष्ट्वीट केले आहे.
CoronaVirus: अमिताभ बच्चन यांच्या ट्विटने वादळ, लॅन्सेटच्या अध्ययनाला आधार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 1:15 AM