बंगळुरू - कोरोना विषाणूच्या फैलावाने सध्या जगासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. कोरोनावरील लस शोधून काढण्यासाठी अनेक संशोधन संस्था आणि कंपन्यांकडून युद्धपातळवीर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, बंगळुरूमधील डी स्केलन नावाच्या कंपनीने असे यंत्र विकसित केले आहे जे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्यापासून रोखणार आहे. स्कोलीन हायपरचार्ज कोरोना कॅनन (शिकोकन) असे या यंत्राचे नाव असून, यूएस एफडीए आणि युरोपियन युनियनने मान्यता दिली आहे.
शिकोकन या यंत्राची रचना छोट्या ड्रमप्रमाणे आहे. हे यंत्र ऑफीस, शाळा, मॉल्स, हॉटेल, विमानतळ तसेच कुठल्याही बंदिस्त ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी लावता येणार आहे. हे यंत्र कोरोना विषाणूमध्ये असलेले स्पाईक प्रोटिन किंवा एस प्रोटीन नष्ट करण्यामध्ये ९९.९ टक्के सक्षम असल्याचे समोर आले आहे.
हे यंत्र कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला बरे करू शकत नसले तरी जीवघेण्या विषाणूचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखण्यामध्ये प्रभावी असल्याचे या यंत्रासंबंधीच्या अहवालात म्हटले आहे. हे यंत्र कुठल्याही बंद खोलीत किंवा बंदिस्त ठिकाणी शेकडो इलेक्ट्रॉनचा मारा करत राहते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेली व्यक्ती अशा ठिकाणी आली तरी त्या व्यक्तीच्या शिंकण्या आणि खोकण्याच्या माध्यमातून बाहेर पडणारे विषाणू इलेक्ट्रॉनच्या तावडीत सापडून नष्ट होतील.
तसेच कुठल्याही पृष्टभागावर असलेले कोरोना विषाणूसुद्धा हे यंत्र नष्ट करू शकते. त्यामुळे पृष्टभागाच्या माध्यमातून होणारा कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी होणार आहे.
दरम्यान, या डिव्हाइसबाबत डॉ. राजाह विजय कुमार यांनी सांगितले की, कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपातकालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या एफडीए विभागाकडून या यंत्राला मान्यता मिळाली आहे. तसेच युरोपियन युनियननेदेखील या यंत्राच्या उपयुक्ततेला हिरवा झेंडा दाखवला आहे. शिकोकन या यंत्राच्या २६ कठोर चाचण्या घेण्यात आल्या असून, त्यामध्ये हे यंत्र पास झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या यंत्राच्या उत्पादनाची परवानगी गेल्या आठवड्यात प्राप्त झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या यंत्राची किंमत आणि निर्मिती परवानाधारकांवर अवंबून असेल. तसेच या यंत्राच्या निर्मितीसाठी नऊ कंपन्यांनी उत्सुकता दाखवल्याचे कुमार यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल