शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

Coronavirus: रोज दहा लाख लसी देण्यासाठी ‘अपोलो’ची यंत्रणा सुसज्ज; आरोग्य सेवकांना देणार प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 4:39 AM

१० हजार आरोग्य सेवकांना देणार ४ महिन्यांचे प्रशिक्षण

नवी दिल्ली : दररोज दहा लाख लोकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचता येईल अशी यंत्रणा आम्ही सज्ज ठेवली आहे, असे अपोलो हॉस्पिटल्सने गुरुवारी जाहीर केले. अपोलो उद्योगसमूहाकडे शीतगृहांच्या सोयीसह औषधांच्या पुरवठ्यासाठी १९ सुसज्ज केंद्रे आहेत. या समुहाच्या मालकीची ७० रुग्णालये, ४००हून अधिक दवाखाने, ५०० आरोग्य केंद्रे, ४००० फार्मसी तसेच अपोलो टष्ट्वेटी फोर बाय सेव्हन हा ओमनी चॅनेल डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.

या लसीकरणासाठी दहा हजार आरोग्य सेवकांना चार महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अपोलोची संलग्न कंपनी असलेल्या केइमेडकडे औषधांचा साठा करण्यासाठी शीतगृहांची मोठी साखळी व वितरणाची उत्तम यंत्रणा आहे. अपोलो हॉस्पिटल्सच्या एक्झिक्युटिव्ह व्हाइस चेअरपर्सन शोभना कामिनेनी यांनी सांगितले की, केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लस विकत घेण्यासाठी खासगी क्षेत्राला परवानगी दिल्यास अपोलो हॉस्पिटल्स उत्पादकांकडून ही लस विकत घेऊन ती इच्छुक व्यक्तीला तसेच रुग्णाला टोचली जाईल. कोरोना लसीचा कोणाही व्यक्तीस केवळ एक डोस देऊन भागणार नाही. आणखी डोस द्यावे लागतील.शीतगृहांच्या विस्ताराची योजनाकोरोना प्रतिबंधक लसीच्या साठवणूक व वितरणासाठी देशात किती शीतगृहे उपलब्ध होऊ शकतील याची चाचपणी यासंदर्भात केंद्र सरकारने नेमलेल्या तज्ज्ञांच्या गटाने सुरू केली आहे. शीतगृहांच्या साखळीचा विस्ताराचीही योजना तज्ज्ञांचा हा गट तयार करत असल्याचे कळते. या गटामध्ये काही उपगटही नेमण्यात आले असून ते कोरोना प्रतिबंधक लसीच्या संशोधनापासून ते उत्पादनापर्यंत अनेक गोष्टींवर मंथन करत आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार १४ ऑक्टोबर रोजी 11.36 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे या चाचण्यांची एकूण संख्या 9.12 कोटी झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या