नवी दिल्ली - दिल्लीत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कंबर कसली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी आवश्यक मास्क, पीपीएफ किट यांची मागणी करण्यात आणि असून, 29 हजार पर्यंत रुग्ण आले तरी त्यांच्यावर उपचार करण्यास राज्य सक्षम आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. तसेच कोरोनाविरोधात लढण्यासाठी 5T प्लॅनची घोषणा केली.
अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या 5T प्लॅनमध्ये टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट, टीम वर्क आणि ट्रेकिंग आणि मॉनिटरिंग या पाच प्रमुख बाबींचा समावेश आहे. तसेच दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. केजरीवाल यांनी सांगितलेल्या 5T बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे...
टेस्टिंग - दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. दक्षिण कोरियाप्रमाणे दिल्लीत मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या घेतल्या जातील. यापूर्वी टेस्टिंग किटची समस्या होती. मात्र आता किट उपलब्ध होऊ लागल्या आहेत. कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागात रॅपिड टेस्ट घेतल्या जातील, असे केजरीवाल यांनी सांगितले.
ट्रेसिंग - तसेच दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्यात येत आहे. आशा व्यक्तींना सेल्फ क्वारेन्टीन करण्यात येत आई. त्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येत आहे.
ट्रीटमेंट - दिल्लीत आतापर्यंत 525 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांसाठी 3 हजार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. टीम वर्क - कोरोनाच्या आपत्तीवर एकट्या दुकाट्याने मात करता येणार नाही. त्यामुळे सर्वांना एक टीम म्हणून काम करावे लागेल. आज सर्व राज्य सरकारे आणि विभागांना एक टीम म्हणून काम करावे लागेल. तसेच लॉकडाऊनचे सर्वांनी पालन करावे लागेल. ट्रेकिंग आणि मॉनिटरिंग - आपल्याला सर्व गोष्टी ट्रॅक कराव्या लागतील. सर्व प्लॅन ट्रॅक करण्याची जबाबदारी माझी आहे. जात आपण कोरोनापेक्षा तीन पावले पुढे राहिलो तरच आपण त्याला हरवू शकू.