शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
2
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
3
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
4
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
5
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
6
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
7
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
8
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
9
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
10
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
11
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
12
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
13
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
14
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
15
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
16
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
17
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
18
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
19
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
20
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 

Coronavirus: काय सांगता! ‘अश्वगंधा’ करणार कोरोनावर मात?; दिल्ली आयआयटीने शोधलं उत्तर! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 1:15 PM

संपूर्ण जग कोरोना साथीच्या आजाराने त्रस्त आहे त्यात भारतात त्याच्या औषधाबद्दल एक चांगली बातमी आहे.

ठळक मुद्देदिल्ली आयआयटीच्या संशोधनात सकारात्मक परिणाम कोविड -१९ औषध बनवण्याच्या दिशेने कार्य सुरु करण्याचा मानस अश्वगंधापासून कोविड -१९ औषध तयार करण्यासाठी अनेक क्लिनिकल ट्रायल्स करणे आवश्यक

नवी दिल्ली - चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात शिरकाव केल्याने अनेक देशांसमोर कोरोना रोखण्याचं मोठं आव्हान उभं झालं आहे. आतापर्यंत ४८ लाखांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ३ लाखांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर जगभरातील संशोधक लस शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ही लस तयार करण्याच्या दृष्टीने अनेक वैज्ञानिक गुंतले आहेत. मात्र अद्याप कोणालाही यात यश आलं नाही.

संपूर्ण जग कोरोना साथीच्या आजाराने त्रस्त आहे त्यात भारतात त्याच्या औषधाबद्दल एक चांगली बातमी आहे. आयआयटी दिल्लीने ही चांगली बातमी दिली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), दिल्लीसह बायोकेमिकल अभियांत्रिकीचे प्रो. डी. सुंदर यांनी शोधून काढले की, अश्वगंधा नैसर्गिक औषध कोविड -१९ रुग्णांना बरे करू शकते.

अश्वगंधाचा एक रासायनिक पदार्थ कोविड १९ पेशींचा विकास रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. हे कोविड -१९ च्या पेशींना विकसित होण्यापासून रोखणारी प्रणाली तयार करण्यात आली आहे. प्रा. डी. सुंदर १५ वर्षांपासून अश्वगंधावर जपानच्या संस्थेसोबत कार्यरत आहेत. आमच्या शोधपेपरचा पहिला अहवाल आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नल ऑफ बायोमोलिक्युलर डायनामिक्समध्ये प्रकाशित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

दोन दिवसांत ते प्रकाशित होणे अपेक्षित आहे. हे संशोधन पुढे घेऊन आम्ही अश्वगंधापासून कोविड -१९ औषध बनवण्याच्या दिशेने कार्य करू असं त्यांनी सांगितले.  अश्वगंधापासून कोविड -१९ औषध तयार करण्यासाठी अनेक क्लिनिकल ट्रायल्स करणे आवश्यक आहे. अत्याधुनिक प्रयोगशाळेत प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही यावरही काम करू असं प्रा. डी सुंदर म्हणाले.

अश्वगंधा परंपरेने भारतात आयुर्वेदिक उपचारांसाठी वापरला जातो. ते म्हणाले की, एका महिन्यापूर्वी केंद्र सरकारने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), आयुष मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांना जोडणारी एक टास्क फोर्स तयार केली. यात त्यांना कोविड -१९ च्या संदर्भात अश्वगंधा, यष्टीमध, गुडुची यांच्यासह पिपाळी, आयुष-६४ (मलेरियावरील औषध) यासारख्या आयुर्वेद औषधांवर संशोधन करण्यास सांगितले होते. प्रा.डी.सुंदर म्हणाले की, अश्वगंधा संशोधन आमच्या बाजूने स्वतंत्रपणे केले गेले आहे. इतर अनेक संशोधक कोविड -१९ वरील आमचे संशोधन वापरू शकतात असंही त्यांनी सांगितले आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

डोनाल्ड ट्रम्प यांची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली; कोरोनावर लस मिळण्याची आशा वाढली!

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी गुजरातच्या कंपनीने बनवलेलं 'धमण १' व्हेंटिलेटर अयशस्वी

कोरोना नसतानाही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प का करतायेत ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’चं सेवन?

४५ वर्षापूर्वी बेपत्ता झालेली व्यक्ती अचानक गावात आली; कुटुंबाने काय केलं पाहा!

आनंदाची बातमी; ‘या’ नैसर्गिक वनस्पतीतून भारत बनवणार कोरोनावर ‘रामबाण’ औषध?

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या