नवी दिल्लीः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आता ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स कंपन्यांना व्हेंटिलेटर्स तयार करण्यास सांगितले आहे. ऑटोमोबाइल कंपन्यांनी या दिशेनं कामाला सुरुवात केली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडला पुढील दोन महिन्यांत स्थानिक उत्पादकांसह मिळून ३० हजार व्हेंटिलेटर तयार करायचे आहेत. सध्या कोरोनाच्या रुग्णांसाठी १४ हजारांहून अधिक व्हेंटिलेटर देशातील विविध रुग्णालयांत उपलब्ध आहेत.नोएडाच्या Agva healthcareलाही महिन्याभरात १० हजार व्हेंटिलेटर्स तयार करण्यास सांगण्यात आलं आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात या व्हेंटिलेटर्सच्या पुरवठ्याला सुरुवात होणार आहे. DRDOसुद्धा येत्या दोन आठवड्यांपासून २० हजार एन९९चे मास्क तयार करणार आहे. सध्या देशभरातील अनेक रुग्णालयांत ११ लाख ९५ हजार एन९५ मास्क उपलब्ध आहेत. दोन घरगुती उत्पादक कंपन्या प्रत्येक दिवशी ५० हजार एन९५ मास्क तयार करत आहेत. पुढच्या आठवड्यापर्यंत प्रत्येक दिवशी १ लाख मास्क तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. रेडक्रॉसने आज १० हजार पीपीई म्हणजेच वैयक्तिक संरक्षक उपकरणे दान केली आहेत. दक्षिण कोरियालाही २० लाख पीपीई देण्याचीही ऑर्डर दिली आहे. मारुती सुझुकी व्हेंटिलेटर आणि मास्क तयार करेलदेशातील आघाडीची कार निर्माता मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडनं (एमएसआयएल) देखील कोरोना विषाणूच्या साथीच्या विरुद्ध लढाईत सक्रिय सहभाग घेतला आहे. व्हेंटिलेटर, मास्क आणि इतर संरक्षक उपकरणे तयार करण्यासाठी कंपनीने इतर उत्पादकांशी करार केला आहे. AgVa हेल्थकेअर आणि मारुतीचं मिळून महिन्याला १० हजार व्हेंटिलेटर बनवण्याचे लक्ष्य आहे. व्हेंटिलेटरची टेक्नोलॉजी, परफॉर्मन्स आणि त्यासंबंधीचे इतर विषय उत्पादन, विक्रीची जबाबदारी AgVa हेल्थकेअरची असेल. व्हेंटिलेटर्स बनवण्यासाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांसाठी मारुती आपल्या सप्लायर्सचा वापर करणार आहे. व्हेंटिलेटर्सचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी फायनान्सची व्यवस्था आणि सर्व आवश्यक परवानग्या मिळवून देण्यासाठी मारुती सुझुकी मदत करणार आहे.
CoronaVirus : ऑटोमोबाइल कंपन्या आता बनवणार व्हेंटिलेटर्स; मोदी सरकारचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 3:03 PM
सध्या कोरोनाच्या रुग्णांसाठी १४ हजारांहून अधिक व्हेंटिलेटर देशातील विविध रुग्णालयांत उपलब्ध आहेत.
ठळक मुद्देकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आता ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स कंपन्यांना व्हेंटिलेटर्स तयार करण्यास सांगितले आहे. भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडला पुढील दोन महिन्यांत स्थानिक उत्पादकांसह मिळून ३० हजार व्हेंटिलेटर तयार करायचे आहेत.