नवी दिल्ली : बाबा रामदेव यांनी कोरोना महामारीवर यशस्वी उपचाराचा दावा करत, कोरोनिल नावाचे औषध मंगळवारी बाजारात आणले. मात्र, यानंतर बाबा रामदेव यांना चहू बाजूंनी होत असलेल्या हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. आयुष मंत्रालयाने या औषधापासून स्वतःला दूर केले. यानंतर सोशल मीडियावर बाबा रामदेव यांच्यावर टीका होताना दिसत आहे.
मात्र, आता आयुष मंत्रालयाने म्हटले आहे, की त्यांना या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलसंदर्भातील सर्व दस्तएवज मिळाले आहेत. तसेच ते संशोधनाच्या रिझल्टची सत्यता पडताळण्यासाठी या दस्तएवजांचा अभ्यास करतील. हे पत्र येताच आता बाबा रामदेव यांची प्रतिक्रियादेखील आली आहे. आयुर्वेदाचा विरोध आणि द्वेश करणाऱ्यांसाठी ही घोर निराशाजनक बातमी आहे, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
ट्विटसोबतच आयुष मंत्रालयाचे पत्रबाबा रामदेव यांनी आपल्या ट्विटसोबतच आयुष मंत्रालयाचे एक पत्रही जोडले आहे. पतंजलीचे आयुर्वेदाचार्य बालकृष्ण यांनी यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयाला एक पत्रही लिहिले होते. या पत्राच्या उत्तरात मंत्रालयाने आचार्य बालकृष्ण यांना एक पत्र लिहिले आहे. यात, त्यांना औषधाच्या क्लिनिकल ट्रायलसंदर्भातील सर्व दस्तएवज मिळाले असल्याचे म्हटले आहे.
आयुष मंत्रालयाने दिले आहेत जाहिरात न करण्याचे आदेश -देशात आणि जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी करोनावरील लस शोधण्यावर भर देण्यात येत आहे. अशातच योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावरील आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लॉन्च केले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आयुर्वेदिक औषध प्रभावी आहे, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. मात्र पतंजली कंपनीने योग्य तपासणी होईपर्यंत कोरोनिल औषधाची जाहिरात न करण्याचे आदेश आयुष मंत्रालयाने दिले आहेत.
कोणीही कोरोना औषधाच्या नावावर प्रचार-प्रसार करू शकत नाही -भारत सरकारच्या निर्देशानुसार कोणीही कोरोनाच्या औषधाच्या नावावर प्रचार-प्रसार करू शकत नाही. आयुष मंत्रालयाकडून वैधता मिळाल्यानंतर, असे करण्याची परवानगी आहे. तसेच विभागाकडून पतंजलीला नोटीस जारी करून उत्तर मागण्यात आले होते. मंगळवारी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी देशातील मीडियासमोर मोठा कार्यक्रम आयोजित करुन कोरोनावर औषध आणल्याचा दावा केला. ज्यात बाबा रामदेव यांनी त्यांच्या औषधाची क्लिनिकल चाचणी केल्याचं सांगितलं होतं.
महत्वाच्या बातम्या -
CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा
CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा
CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कार
मोदी सरकारनं पतंजलीच्या कोरोना औषधाची जाहिरात थांबवली, बाबा रामदेव म्हणाले...