बंगळुरू: देशातील कोरोनाचा विळखा वाढत आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर बंगळुरू पोलिसांनी कोरोना विरुद्धच्या संघर्षात साथ देण्यासाठी सर्वसामान्यांना साद घातली आहे. पोलिसांना मदत करण्यासाठी पुढे या, 'सिव्हिल पोलीस वॉर्डन' व्हा, असं आवाहन शहराचे पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी केलं आहे.बंगळुरूतील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनावरही ताण आला आहे. त्यामुळे आता पोलिसांनी नागरिकांची मदत घेण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी १८ ते ४५ वर्षांच्या व्यक्तींना स्वयंसेवक म्हणून काम करता येईल. त्यांना 'सिव्हिल पोलीस वॉर्डन' म्हणून सेवा देता येईल, अशी माहिती राव यांनी दिली. कोरोना विरुद्धच्या लढ्यात योगदान देण्यासाठी उत्सुक असलेल्या व्यक्तींनी http://bcp.gov.in वर जाऊन नोंदणी करावी, असं आवाहन आयुक्तांनी केलं.
CoronaVirus News: कोरोना विरुद्धच्या संघर्षात पुढे या, 'सिव्हिल पोलीस वॉर्डन' व्हा; पोलिसांची नागरिकांना साद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 3:24 PM