शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

यही मौका है! नितीन गडकरींनी सांगितला चीनवर 'वार' करण्याचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 1:32 PM

गडकरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आजवर जगात दोन लाख जणांचा बळी गेला आहे. यामुळे चीनकडे तिरस्काराच्या नजरेतून जग पाहू लागले आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्था संकटात आल्या आहेत. तसेच माणसेही मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुखी पडत आहेत. आजवर जगात दोन लाख जणांचा बळी गेला आहे. यामुळे चीनकडे तिरस्काराच्या नजरेतून जग पाहू लागले आहे. अमेरिकेने तर चीनला परिणाम भोगण्याची धमकीच देऊन टाकली आहे. यावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रणनीती सांगितली आहे. 

गडकरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना संकटामुळे जगाच्या नजरेत चीन खलनायक झाला आहे. भारताला याच संधीचा लाभ घ्यायला हवा. या आर्थिक संकटाला संधीमध्ये बदलून परदेशी गुंतवणुकीचा जास्तीत जास्त आकर्षित करण्यावर लक्ष द्यायला हवे, असे सांगितले. यावेळी गडकरींनी जपानचे उदाहरण देताना सांगितले की, आम्हालाही असा विचार करायला हवा आणि आम्ही त्याकडे लक्षही देणार आहोत. चीनमधून गाशा गुंडाळणाऱ्या कंपन्यांना जपानने मोठे आर्थिक पॅकेज घोषित केले आहे. 

गडकरी यांनी सांगितले की, परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी परवानग्या आणि दुसऱ्या अन्य सुविधांमध्ये वेग आणला जाणार आहे. अर्थ मंत्रालयसह सर्व विभाग आणि आरबीआय कोरोनानंतर अर्थव्यवस्थेमध्ये वेग आणण्यासाठी नीती बनवत आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाची अर्थव्यवस्था ५ खरब डॉलरची बनविण्याचे स्वप्न साकार होणार आहे. या काळात आपण १०० लाख कोटींच्या पायाभूत सुविधाही निर्माण करू शकणार आहोत. 

चीनवर कारवाईचा मुद्दा संवेदनशीलचीनने कोरोनाची माहिती मुद्दामहून लपविली का, यावर भारत कारवाई करेल का? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला. यावर गडकरींनी सांगितले की, हा मुद्दा परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान यांच्याशी संबंधीत संवेदनशील विषय आहे. यावर काही सांगणे उचित ठरणार नाही. 

अन्य बातम्या वाचा...

CoronaVirus शारीरिक संबंधाद्वारे कोरोना पसरतो? वुहानमध्ये संशोधन

एक नाही, तर तीन प्रकारच्या कोरोनाचा देशावर हल्ला; गुजरातचे संशोधक धास्तावले

CoronaVirus नफेखोरी! 245 ची रॅपिड टेस्टिंग किट ६०० रुपयांना खरेदी; काँग्रेसने विचारला जाब

युएईचे भारतीय अरबपती बी. आर. शेट्टी 'कंगाल'; एका अहवालाने साम्राज्याला सुरुंग लावला

किम जोंग उन काहीच नाही, त्याच्यापेक्षाही डेंजर आहे बहीण क‍िम यो जोंग

 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीcorona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन