नवी दिल्ली - जगातील इतर काही भागांत कोरोनाची दुसरी लाट आली असली तरी भारतात मात्र कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने घट होत आहे. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे २२ हजार ६५ नवे रुग्ण सापडले असून, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९९ लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या चार महिन्यांनंतर प्रथमच देशात एवढ्या कमी संख्येने रुग्ण सापडले आहेत.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत देशभरामध्ये कोरोनाचे २२ हजार ६५ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९९ लाख, सहा हजार १६५ एवढी झाली आहे. तर गेल्या २४ तासांत ३५४ जणांचा मृत्यू झाल्याने देशात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाक ४३ हजार ७०९ झाली आहे.अजून एक दिलासादायक बाब म्हणजे गेल्या दिवसभरात देशात ३४ हजार ४७७ जणांनी कोरोनावर मात केली असून, आतापर्यंत देशातील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या ९४ लाख २२ हजार ६३६ झाली आहे. तर सद्यस्थितीत देशातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही ३ लाख ३९ हजार ८२० आहे. देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट हा ९५. १२ टक्के एवढा झाला आहे.देशात आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ४३ हजार ७०९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात ४८ हजार २६९, कर्नाटकमध्ये ११ हजार ९५४, तामिळनाडूमध्ये ११ हजार ९०९, दिल्लीमध्ये १० हजार ७४, पश्चिम बंगालमध्ये ९ हजार १००, उत्तर प्रदेशमध्ये ८ हजार ३८, आंध्र प्रदेशमध्ये ७ हजार ५९, पंजाबमध्ये ५ हजार ९८, गुजरातमध्ये ४ हजार १८२ आणि मध्य प्रदेशमध्ये ३ हजार ४१२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
coronavirus: मोठ्ठा दिलासा, सव्वा चार महिन्यांनंतर देशात सापडले कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण
By बाळकृष्ण परब | Published: December 15, 2020 11:57 AM
coronavirus: जगातील इतर काही भागांत कोरोनाची दुसरी लाट आली असली तरी भारतात मात्र कोरोनाच्या रुग्णसंख्येत वेगाने घट होत आहे.
ठळक मुद्देगेल्या २४ तासांत देशभरात सापडले कोरोनाचे २२ हजार ६५ नवे रुग्ण देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९९ लाखांच्या पुढे गेली आहेगेल्या २४ तासांत ३५४ जणांचा मृत्यू झाल्याने देशात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या १ लाक ४३ हजार ७०९ झाली आहे