मुंबई : जगातील सर्वात मोठ्या स्टील कंपनीचे मालक आणि भारतीय वंशाचे धनाढ्य उद्योजक लक्ष्मी मित्तल यांनी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी मदत जाहीर केली आहे. आर्सेलर मित्तल आणि निप्पॉन स्टील यांनी एकत्रित पंतप्रधान केअर्स फंडाला मदत जाहीर केली आहे.
यावेळी मित्तल म्हणाले की, अशा संकटाच्या काळामध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे या साथीचा शक्य तेवढ्या वेगाने प्रतिकार करण्यासाठी सरकार, कंपन्या आणि नागरिकांनी आपली सगळी संसाधने एकत्र आणून एकत्र काम करणे अत्यावश्यक आहे.आर्सेलरमित्तल आणि निप्पॉन स्टील यांचा संयुक्त उपक्रम असलेली एएम/एनएस इंडिया आणि हिंदुस्तान पेट्रोलियम व मित्तल एनर्जी इन्व्हेस्टमेंट्स यांची भागीदारी असलेली एचएमईएल यांनी कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनमध्ये त्रासलेल्या कुटुंबांना मदत करण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही उपक्रमांनीमिळून पीएम केअरला 100 कोटी रुपयांची मदत दिली आहे.
एवढ्यावरच मित्तल थांबलेले नसून त्यांनी देशातील ५००० हून अधिक गरीब, अडकलेल्या लोकांनी विविध संस्थांच्या माध्यमातून रोजचे जेवण आणि ३०००० हून अधिक लोकांना रोज अन्नाची पाकिटे वाटण्याची सोय केली आहे. तसेच देशातील फॅक्टरींच्या परिसरात अॅम्बुलन्स सेवा आणि उपचार केंदांची उभारणी हाती घेतली आहे. तसेच लॉकडाऊन काळात कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा पगारही केला जाणार आहे.