शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

CoronaVirus: मोदी सरकारचा मोठा निर्णय; इंग्लंड, अमेरिका, जपानच्या लशींना मंजुरीची आवश्यकता नाही, अमित शाह म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 6:34 PM

"कोरानाच्या नव्या लाटेला रोखण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्वाची पावले उचलली आहेत. जगात जेथे-जेथे दुसरी अथवा तिसरी लाट आली, ती पहिल्या लाटेच्या तुलनेत अडीच ते तीन पट अधिक तिव्र आहे." (CoronaVirus)

नवी दिल्ली - कोरोनाने देशात थैमान घातले असतानाच केंद्रातील मोदी सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. यातच, इंग्लंड, अमेरिका, जपान आणि डब्ल्यूएचओने ज्या कोरोना लशींना मंजुरी दिली आहे, त्या लशींना भारतात मंजुरी घेण्याची आवश्यकता नसेल, तसेच याचा परिणाम मे महिन्यापासून दिसायला सुरुवात होईल. असा विश्वास केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी दिला आहे. (BJP Amit Shah said Centers decision England America Japan approved vaccines do not need approval)

एका टीव्ही वाहिनीवरील चर्चेत सोमवारी शाह म्हणाले, कोरानाच्या नव्या लाटेला रोखण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्वाची पावले उचलली आहेत. जगात जेथे-जेथे दुसरी अथवा तिसरी लाट आली, ती पहिल्या लाटेच्या तुलनेत अडीच ते तीन पट अधिक तिव्र आहे. यात जो नवा व्हायरस बनला आहे, तो कमी घात आहे, मात्र अधिक वेगाने पसरतो. कोरोनाच्या या नव्या व्हायरसवर वैज्ञानिक वेगाने काम करत आहेत.

देश सोडून चिनी कोरोना लस घेण्यासाठी नेपाळमध्ये का जातायत लोक? उत्तर वाचून व्हाल अवाक!

...म्हणून देशात ऑक्सिजन संकट -देशातील ऑक्सिजनच्या कमतरतेचा उल्लेख करत शाह म्हणाले, काही राज्ये ऑक्सीजनचा स्टॉक करत आहेत, त्यांनी आपल्या रुग्णांसाठी, असे करायलाही हवे. केंद्र सरकारने ऑक्सीजनची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याचे योग्य वितरण व्हावे, यासाठी पंतप्रधानांनी पावले टाकायला सुरुवात केली आहे. एवढेच नाही, तर रेमेडेसिवीरच्या निर्यातीवर तत्काळ बंदी आणून तिचे उत्पादनही तीन पट वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही शाह म्हणाले.

लशींसंदर्भात बोलताना शाह म्हणाले, यूएस, यूके, जपान आणि WHOने ज्या लशींना मान्यता दिली आहे, त्या लशी लवकरच भारतात उपलब्ध होतील. आम्ही लसीकरणाची सुविधाही वाढवत आहोत. मे महिन्यापासूनच याचा निर्णयही दिसू लागेल.

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

व्हायरस रूप बदलतोय - गृह मंत्री शाह यांनी यावेळी स्पष्ट केले, की या निर्णयांचा आणि कोरोना पसरण्याचा काहीही संबंध नाही. कारण व्हायरस आपले स्वरूप बदलतो आणि औषधांसोबतही स्वतःला अॅडजस्ट करत आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाcorona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारCorona vaccineकोरोनाची लस