पाटणा - गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. दरम्यान, कोरोनाशी झुंजत असलेले बिहारमधीलभाजपा आमदार सुनिल कुमार सिंह यांचे मंगळवारी संध्याकाळी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलगे व एक मुली असा परिवार आहे. कोरोनामुळे बिहारमध्ये कुठल्या मोठ्या नेत्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यांच्या निधनाबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
६६ वर्षीय सुनील कुमार सिंह यांच्यावर पाटणा येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या मृत्यूची माहिती देताना नोडल अधिकारी संजीव कुमार यांनी सांगितले की, सुनील कुमार सिंह यांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना शुगर आमि हायपरटेंशनचा त्रास होता. अखेरच्या काळात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
सुनिल कुमार सिंह हे बिहार विधान परिषदेमध्ये दरभंगामधील स्थानिक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांना १३ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांत बिहारमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत असतानाच राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मंत्री विनोद कुमार सिंह, भाजपा आमदार जिबेश कुमार मिश्रा, काँग्रेस आमदार आनंद शंकर सिंह, राजद आमदार शाहनवाझ आलम आणि जेडीयू आमदार खालिद अन्वर यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी सुनिल कुमार सिंह यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. सुनिल सिंह हे जनतेमध्ये लोकप्रिय होते. त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यांच्या निधनामुळे राजकारण आणि समाजाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे, असे नितीश कुमार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी
गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…