शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

CoronaVirus : मजूर, बेघरांसाठी भाजपचे ‘कम्युनिटी किचन’; पक्षाची मोठी मोहीम 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 1:27 AM

CoronaVirus : भाजप अशा वर्गाच्या जेवणाचा प्रश्न मिटवण्यासाठी कम्युनिटी किचनचे जाळे (नेटवर्क) निर्माण करीत आहे. या जाळ््याच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर व बेघरांना जेवण दिले जाईल.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका बसणाऱ्या वर्गासाठी भाजपने मोठी मोहीम राबवण्याचे ठरवले आहे.भाजप अशा वर्गाच्या जेवणाचा प्रश्न मिटवण्यासाठी कम्युनिटी किचनचे जाळे (नेटवर्क) निर्माण करीत आहे. या जाळ््याच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर व बेघरांना जेवण दिले जाईल. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलेल्या आवाहनानुसार देशात कम्युनिटी किचनचे जाळे निर्माण करण्यास पक्षाने सुरवात केली आहे. पक्षाने म्हटले आहे की, आम्ही किमान एक हजार लोकांसाठी भोजन बनवू शकेल एवढ्या क्षमतेचे देशात सामुदायिक स्वयंपाकघरांचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याचा उद्देश शहरातील गरिबांची गैरसोय टाळण्याचा आहे.सहभागी होऊ इच्छिणाºया व्यक्ती आॅनलाईन करू शकतात अर्ज- या मोहिमेशी संबंधित पक्षाच्या एका पदाधिकाºयाने सांगितले की, देशभरात ‘कम्युनिटी किचन’ चालवणाºया सक्षम वेगवेगळ््या संस्था आणि व्यक्तिंना या नेटवर्कमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या कामात सहभागी होऊ इच्छिणाºया व्यक्ती व संस्था यासाठी आॅनलाईन अर्ज करू शकतात.- यासाठी त्यांना आॅनलाईन फॉर्म भरावा लागेल. अशा कम्युनिटी किचनला पक्षाकडून शक्य ती सगळी मदत दिली जाईल. या पुढाकाराला चांगला प्रतिसाद लाभला आहे. या मोहिमेचा परिणाम एकदोन दिवसांत दिसू लागेल, असे हा पदाधिकारी म्हणाला.- भाजपने सामान्य लोक आणि कार्यकर्तेही या मोहिमेत सहभागी व्हावेत यासाठी सोशल मिडियाची मदत घेतली आहे. याकरिता टिष्ट्वटरवर ‘लेटस फीड द पूअर’ नावाची मोहीम चालवली जात आहे.५ कोटी कुटुंबांना भाजप देणार भोजनसध्या सुरु असलेल्या देशव्यापी ‘लॉकडाऊन’च्या काळात हातावर पोट असणाºया गरीब व वंचित वर्गातील नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी देशभरातील अशा पाच कोटी कुटुंबांच्या रोजच्या जेवणाची सोय करण्याची तयारी भारतीय जनता पार्टीने सुरु केली आहे.या अडचणीच्या काळात आर्थिक स्थिती चांगली असलेल्या प्रत्येक व्यक्तीने नऊ गरजूंचे पोट भरण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाराणसी मतदारसंघातील नागरिकांशी मंगळवारी व्हिडिओ संवाद साधताना केले होते. हिच कल्पना पक्षाच्या पातळीवर राबविण्याचा भाजपाचा विचारआहे.भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बुधवारी सर्व राज्यांच्या पक्षप्रमुखांसोबत घेतलेल्या व्हिडिओ बैठकीत त्यासंबंधीचे निर्देशदिले.या ‘लॉकडाऊन’च्या काळात जे दररोज प्रत्येकी किमान पाच कुटुंबांच्या जेवणाची सोय करू शकतील असे देशभरातील एक कोटी पक्ष कार्यकर्ते निवडावेत, असे नड्डा यांनी राज्य पक्षप्रमुखांना सांगितले.अशा प्रकारे पाच कोटी गरजू कुटुंबांच्या जेवणाची सोय होऊ शकेल. ही व्यवस्था गुरुवारपासूनच सुरु होऊ शकेल अशा प्रकारे तातडीने पावले उचलण्याच्या सूचना नड्डा यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :BJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या