राजकोट: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज कोरोनाचे ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा २ लाखांच्या खाली आला आहे. कोरोना रुग्ण कमी होत असताना दुसऱ्या बाजूला म्युकरमायकोसिसचे (ब्लॅक फंगस) रुग्ण वाढू लागले आहेत. गुजरातमधील एका व्यक्तीला पाच महिन्यांपूर्वी ब्लॅक फंगसची लागण झाली. त्यातून तो अद्याप बरा झालेला नाही.कोरोनाच्या आगीतून सुटलेले म्युकरमायकोसीसच्या फुफाट्यातराजकोटमध्ये राहणाऱ्या विमल दोषींना गेल्या वर्षी कोरोनाची बाधा झाली. त्यातून ते बरे झाले. मात्र त्यानंतर त्यांना ब्लॅक फंगसची लागण झाली. ब्लॅक फंगसचा संसर्ग वाढत असल्यानं ते त्रासले आहेत. विमल यांना आतापर्यंत ३९ इंजेक्शन्स देण्यात आली आहेत. पाच महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दरम्यान त्यांच्यावर सहा शस्त्रक्रिया झाल्या आहेत. आता लवकरच त्यांच्यावर सातवी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.चिंताजनक! रुग्णालयात दाखल झालेल्या 3.6 टक्के रुग्णांना फंगल इन्फेक्शन; ICMR चा मोठा दावाविमल दोषी त्यांच्या पत्नीसह राजकोटमध्ये वास्तव्यास असतात. विमल काही कामानिमित्त नोव्हेंबरमध्ये अहमदाबादला गेले होते. तेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांनी १५ दिवस उपचार घेतले आणि ते बरे झाले, अशी माहिती त्यांच्या पत्नी चांदनी यांनी दिली. उपचारादरम्यान विमल यांना ऑक्सिजनसोबत स्टेरॉईड्स देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या नाकात ब्लॅक फंगस आढळून आला. आणंदच्या वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्या नाकावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांचा डोळा सुजला. नाक आणि त्याच्या आसपासच्या भागावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ब्लॅक फंगस त्यांच्या डोक्यापर्यंत पोहोचला. त्यामुळे आता न्युरो सर्जरी करावी लागणार आहे.विमल यांच्यावर उपचार सुरू असल्यानं चांदनी त्यांच्यासोबत आणंदमध्येच राहत आहेत. 'आम्ही केलेली बचत जवळपास संपत आली आहे. उपचारांचा खर्च खूप मोठा असल्यानं आम्हाला आमचं घरदेखील विकावं लागलं. आतापर्यंत ४१ लाख रुपये खर्च झाले आहेत. यापुढेही १० ते १५ लाख रुपयांची आवश्यकता आहे,' अशी व्यथा चांदनी यांनी मांडली.
Black Fungus: भयावह! ५ महिने, ६ शस्त्रक्रिया, ३९ इंजेक्शन्स; उपचारांसाठी घरही विकलं; तरीही ब्लॅक फंगस पाठ सोडेना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 8:42 AM