नवी दिल्ली : कोरोनामुळे लॉकडाऊन वाढल्याने आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात ४० बेसिस पॉईंटची कपात केली आहे. याचबरोबर त्यांनी महागाईवर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान असल्याचेही सांगितले. तसेच मुदतीच्या कर्जावर मोठा दिलासा दिला आहे.
आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज लाईव्ह पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशाचा जीडीपी शून्यापेक्षा खाली जाणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. तसेच त्यांनी आधी देण्यात आलेला ईएमआय दिलासा आणखी तीन महिन्यांनी वाढविला आहे. यामुळे ऑगस्टपर्यंत ईएमआय नाही भरता आला तरीही त्याचा दंड किंवा क्रेडिट रिपोर्टवर परिणाम होणार नाही.
दास यांनी सुरुवातीला रेपो रेटमध्ये ४० बेसिस पॉईंटची कपात केल्याची घोषणा केली. यामुळे ४.४० वरून हा दर ४ टक्क्यांवर आला आहे. यामुळे कर्जावरील व्याज कमी झाल्याचा फायदा कर्जदरांना होणार आहे. मान्सून सकारात्मक असल्याने कृषी क्षेत्राकडून मोठी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८३ दिवसांनी दिल्ली सोडली; ओडिशा, पश्चिम बंगालचा पाहणी दौरा
चीनची एकी! स्पर्धक असुनही शाओमी, ओप्पो, वनप्लस, व्हिवो आले एकत्र
चीन पुन्हा जगाला हादरवणार; 'नव्या' दीर्घायुषी कोरोनाचे वागणे आणखी खतरनाक
CoronaVirus नवरी नटली, सुपारी फुटली! नववधू पॉझिटिव्ह आली; अख्खी वरात क्वारंटाईन झाली