नवी दिल्लीः कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातला असून, अनेक देशांत संक्रमितांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिवशीच आज कोरोना वॉरियर्सचा सन्मान केला जात असल्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. बुद्ध पौर्णिमेचं औचित्य साधून एक आभासी कार्यक्रम आयोजित केला असून, त्याला बड्या नेत्यांची उपस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले की, भगवान बुद्धांनी जगाला सेवेचा संदेश दिला आहे. भगवान बुद्धांनी भारतीय परंपरा समृद्ध केली, ते स्वतःच आयुष्याचे दीप झाले आणि इतरांचं जीवनही प्रकाशमान केलं. भगवान बुद्धांचा संदेश आपल्या आयुष्यात निरंतर आहे, बुद्ध हे फक्त नाव नाही, तर प्रत्येक मानवाच्या हृदयात धडकणारा विचार आहे. भगवान बुद्ध यांनी सांगितलेले चार मार्ग दया, करुणा, समभाव, स्वीकार भारतभूमीसाठी प्रेरणादायी आहेत. त्याग, समर्पणाची भावना म्हणजे, गौतम बुद्ध असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे. यावेळी परिस्थिती वेगळी आहे, जग कठीण परिस्थितीतून जात आहे. तुमच्यामध्ये येणं माझ्यासाठी एरव्ही सौभाग्य असतं, परंतु सद्य परिस्थिती त्यास परवानगी देत नाही. बुद्धांच्या पावलावर पाऊल ठेवून भारत आज सर्वांना मदत करत आहे, मग तो देशात असो की परदेशात, या काळात नफा-तोटा पाहिला जात नाही. भारत जगाच्या पाठीशी उभा आहे. कोणताही स्वार्थ न बाळगता आपल्याला आपल्या कुटुंबाचे तसेच परिसराचे संरक्षण करावे लागेल. संकटाच्या वेळी सर्वांना मदत करणे हा प्रत्येकाचा धर्म आहे. सामाजिक कार्य निरंतर सेवेने केले पाहिजे, इतरांवर करुणा असणे महत्त्वाचे असते, असंही मोदी म्हणाले आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus: कोरोना विषाणूवर मोठं संशोधन; पण खुलासा करण्याआधीच चिनी वैज्ञानिकाची गोळ्या घालून हत्या
CoronaVirus News: कोरोनाची लस जगाला देणार का?; भारताचा उल्लेख करुन इस्रायलचं लय भारी उत्तर
पाकिस्तानातून राजस्थानमार्गे भारतात येतंय नवं संकट; शेतकऱ्यांना सतावतेय चिंता