नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात देशामध्ये किती जणांच्या नोकºया गेल्या, तसेच किती जणांच्या पगारात कपात झाली किंवा उशिराने पगार मिळाले या सर्व गोष्टींची आकडेवारी जमविण्याचे आदेश केंद्र सरकारने एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड आॅर्गनायझेशन (ईपीएफओ) व एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (ईएसआयसी) या दोन संघटनांना दिले आहेत. ही माहिती गोळा झाल्यानंतर ती पंतप्रधान कार्यालयाला सादर केली जाईल.कोरोना साथीमुळे पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे सध्या बंद ठेवण्यात आले आहेत. देशातील महत्त्वाचे आर्थिक व्यवहार ठप्प असून अनेकांचा रोजगार बुडाला आहे. संघटित क्षेत्रात अनेक जण नोकºया गमावण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही कर्मचाºयाचा पगार कापू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योजकांना केले आहे. मात्र, तरीही अनेक नोकरदारांच्या डोक्यावर वेतन कपात, तसेच नोकरी गमावण्याची टांगती तलवार कायम आहे. लॉकडाऊनच्या काळात किती लोकांनी नोकºया गमावल्या, वेतन कपात झाली आदींचा तपशील जमविण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. यासंदर्भात एप्रिल महिन्याची अखेर ते ७ मेपर्यंतच्या कालावधीतील घडामोडींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. ईपीएफओचे ६ कोटी सदस्य आहेत.त्यामध्ये पेन्शनरांचाही समावेश आहे, तर ईएसआयसीचे ३ कोटी सदस्य आहेत.२० कॉल सेंटर स्थापनईपीएफओच्या विभागीय कार्यालयांनी आपल्या सदस्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून त्यांची लॉकडाऊनच्या काळातील वेतन, नोकरीविषयक स्थिती जाणून घ्यायची आहे. त्यासाठी कामगार मंत्रालयाने २० कॉल सेंटरची स्थापना केली आहे. देशात सुमारे ५० कोटी कामगार असून त्यातील ५ कोटी कामगार संघटित क्षेत्रामध्ये आहेत.
लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या जाणाऱ्यांची होणार मोजदाद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 1:46 AM