Coronavirus: वाढत्या कोरोनामुळं केंद्र सरकारचं सर्व राज्यांना पत्र; केरळ-महाराष्ट्रानं वाढवली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 07:27 PM2021-08-28T19:27:48+5:302021-08-28T19:30:36+5:30

प्रशासनाने ज्या जिल्ह्यात कोरोना संक्रमित पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे त्यात प्रो एक्टिव कन्टेंन्मेंटसाठी पाऊल उचलावीत.

Coronavirus: Central government's letter to all states due to rising corona | Coronavirus: वाढत्या कोरोनामुळं केंद्र सरकारचं सर्व राज्यांना पत्र; केरळ-महाराष्ट्रानं वाढवली चिंता

Coronavirus: वाढत्या कोरोनामुळं केंद्र सरकारचं सर्व राज्यांना पत्र; केरळ-महाराष्ट्रानं वाढवली चिंता

Next
ठळक मुद्देसोशल डिस्टेंसिंग पाळणं, मास्क घालणं, हात धुणे या मार्गदर्शक सूचनांचं पालन लोकांनी करायला हवं दुसरीकडे परराष्ट्र राज्यमंत्री वी मुरलीधरन यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरुन केरळ सरकारवर निशाणा साधलालोकांची गर्दी रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर सक्ती करा

नवी दिल्ली – देशभरात एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत असतानाच महाराष्ट्र आणि केरळात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येने चिंता वाढली आहे. वाढता पॉझिटिव्हिटी दर, सक्रीय रुग्ण यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. अचानक वाढणाऱ्या या संख्येमुळे गृह मंत्रालयही चिंतेत आहे. याबाबत गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे.

गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, प्रशासनाने ज्या जिल्ह्यात कोरोना संक्रमित पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे त्यात प्रो एक्टिव कन्टेंन्मेंटसाठी पाऊल उचलावीत. संक्रमण कमी करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. उत्सव, सणांचे दिवस लक्षात घेता गर्दी होण्यापासून आळा घालावा. लोकांची गर्दी रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर सक्ती करा असंही त्यांनी म्हटलं आहे.

तसेच आपल्याला कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी चाचणी, पडताळणी, लसीकरण आणि कोरोना नियमांचे पालन करणं आवश्यक आहे. सोशल डिस्टेंसिंग पाळणं, मास्क घालणं, हात धुणे या मार्गदर्शक सूचनांचं पालन लोकांनी करायला हवं असं अजय भल्ला यांनी पत्रात म्हटलं आहे. तर दुसरीकडे परराष्ट्र राज्यमंत्री वी मुरलीधरन यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरुन केरळ सरकारवर निशाणा साधला आहे.

वी मुरलीधरन म्हणाले की, केरळमध्ये कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याठिकाणी सरकार जनतेला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतेय. केरळमध्ये होम क्वारंटाईन अयशस्वी ठरलं आहे. त्याचसोबत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणंही खूप कमी प्रमाणात होतंय. केरळ सरकारने राज्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी योग्य ती पावलं उचलणं गरजेचे आहे असं त्यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रकोप! तिसऱ्या लाटेचा धोका?

वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शनिवारी (२८ ऑगस्ट) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४६,७५९नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३,२६,४९,९४७ पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ४,३७,३७० वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी ३,५९,७७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ३,१८,५२,८०२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे.

महाराष्ट्रात समोर आले ४,६५४ नवे कोरोना रुग्ण

आकडेवारीनुसार, शुक्रवारी गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ६५४ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १७० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ३ हजार ३०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ५२ हजार १५० रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ५१ हजार ५७४ इतकी आहे.

Web Title: Coronavirus: Central government's letter to all states due to rising corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.