शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

Coronavirus: केंद्रीय लोकसेवा आयोगाची प्राथमिक परीक्षा लांबणीवर; ३१ मे टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 11:09 PM

२० मेनंतर आढावा घेऊन तारीख जाहीर केली जाणार

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवांसाठीची प्राथमिक परीक्षा (प्रिलिमनरी एक्झाम) पुढील सूचना दिली जाईपर्यंत लांबणीवर टाकली आहे. ही परीक्षा आधीच्या वेळापत्रकानुसार ३१ मे रोजी होणार होती.

युपीएससीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार २० मेनंतर परिस्थितीचा अभ्यास करून नवी तारीख ठरवली जाईल. सोमवारी आयोगाची बैठक अरविंद सक्सेना यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पूर्व नियोजित तारीख पुढे ढकलण्यासाठीच्या या बैठकीला आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारने चार मेपासून लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी वाढवल्यानंतर परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. जे काही करणे आवश्यक होते ते केंद्रीय लोकसेवा आयोगाने केले, असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या अधिकाºयाने सांगितले. आज कोरोना विषाणूचा फैलाव होत असताना मोठ्या प्रमाणावर परीक्षा घेणे योग्य नाही. आता ही परीक्षा कधी घेतली जाईल यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. लॉकडाऊननंतर परिस्थितीचा आढावा घेऊन नवी तारीख निश्चित केली जाईल, असेही हा अधिकारी म्हणाला. कोरोना विषाणू महामारीचा होत असलेला फैलाव आणि लॉकडाऊनचे निर्बंध विचारात घेऊन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, असे लोकसेवा आयोगाच्या आणखी एका अधिकाºयाने सांगितले. नवीन तारीख २० मेनंतर जाहीर केली जाईल. आयोग विद्यार्थ्यांना या आठवड्यात अ‍ॅडमिट कार्डस देणार होते. परंतु, आता त्याने लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे ती प्रक्रिया लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला.दरवर्षी दहा लाख विद्यार्थी करतात नोंदणीदरवर्षी जवळपास १० लाख विद्यार्थी नागरी सेवा प्राथमिक परीक्षेसाठी नाव नोंदणी करतात. जवळपास १.६ लाख पदाधिकारी अडीच हजार केंद्रांवर ही परीक्षा घेण्याचे काम करतात. हरयाणा नागरी सेवांसारख्या इतर अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा ज्या पाच जूनपासून घेतल्या जाणार होत्या त्यादेखील लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगcorona virusकोरोना वायरस बातम्या