शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

Coronavirus : थर्मल स्कॅनरने ताप मोजण्यासाठी डोक्याऐवजी या भागांची करा तपासणी, मिळू शकतो अधिक अजून निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 4:07 PM

Coronavirus in India : तुम्ही थर्मल स्कॅनरने डोक्याचे तापमान तपासत असाल तर थोडे थांबा. नव्याने समोर आलेल्या संशोधनामध्ये थर्मल स्कॅनरने कोरोनाच्या तापाची तपासणी करणे हा तपासणीचा योग्य पर्याय नसल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देफोरडेह थर्मामीटर किंवा स्कॅनर तापाची तपासणी करण्यासाठीचा सुलभ आणि लोकप्रिय पर्याय आहेमात्र ताप मोजण्याची ही योग्य पद्धत नसल्याचे सांगण्यात येत आहेतापमानामधील स्पाइक रेकॉर्ड करण्यासाठी तुमची बोटे आणि डोळे या अशा दोन जागा आहेत. जिथून तापाची तपासणी केली गेली पाहिजे

मुंबई - गेल्या सव्वा वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. (Coronavirus in India) त्यामुळे शरीरात कणकण जावणू लागल्यानंतर तपासणी करून घेण्याकडे कल वाढू लागला आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय आल्यावर तुम्ही थर्मल स्कॅनरने डोक्याचे तापमान तपासत असाल तर थोडे थांबा. नव्याने समोर आलेल्या संशोधनामध्ये थर्मल स्कॅनरने कोरोनाच्या तापाची तपासणी करणे हा तपासणीचा योग्य पर्याय नसल्याचे समोर आले आहे.  (Check eyes & fingers instead of the head to measure the temperature with a thermal scanner, more results can be obtained  ) ताप हे कोरोनाच्या सर्वात प्रमुख लक्षणांपैकी एक लक्षण आहे. त्यासाठी फोरडेह थर्मामीटर किंवा स्कॅनर तापाची तपासणी करण्यासाठीचा सुलभ आणि लोकप्रिय पर्याय आहे. त्याच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणींही आजारी व्यक्तीचा सहजपणे शोध घेता येऊ शकतो. तुम्ही पाहिलं असेल की, ऑफिस ट्रेन, मॉल, विमानतळ अशा ठिकाणी थर्मामीटरचा वापर कुठल्याही व्यक्तीच्या डोक्याच्या आणि मनगटाच्या तापमानाची तपासणी करण्यासाठी केला जातो. मात्र ताप मोजण्याची ही योग्य पद्धत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्याऐवजी विषाणूच्या वाढत्या संसर्गामध्ये ताप मोजण्यासाठी शरीरातील दोन अन्य भागांची तपासणी करण्यााबत चर्चा सुरू आहे. 

इन्फ्रारेड गन्स, थर्मामीटर आणि स्कॅनर यांच्या माध्यमातून अंतर घटवतात. अनेक तज्ज्ञांनी फोरडेह थर्मामीटरसारख्या उपकरणाच्या रिझल्ट्सबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामधून दाखवल्या जाणाऱ्या चुकीच्या निष्कर्षांवर टीका होत आहे. दुसरी बाब म्हणजे या उपकरणांचा वापर करताना चुकीचे अंतर असेल किंवा अनुपयुक्त वातावरणात त्याचा वापर केला तर चुकीचे निष्कर्ष येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तज्ज्ञ स्कॅनरचा वापर डोक्यावर नाही तर शरीरातील अन्य दोन भागांवर करून तापमान तपासण्याची गरज असल्याचे सांगतात. एक्सपिरिमेंटल फिजियोलॉजी या नियतकालिकामध्ये हल्लीच प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार, तापमानामधील स्पाइक रेकॉर्ड करण्यासाठी तुमची बोटे आणि डोळे या अशा दोन जागा आहेत. जिथून तापाची तपासणी केली गेली पाहिजे. या जागांमधून ताप तपासण्यासाठीच्या अचूक तापमानाची माहिती मिळू शकते. या ठिकाणी केलेल्या तपासणीमधून चुकीचे निष्कर्ष मिळण्याची शक्यता कमी आहे. कपाळाच्या अगदी खाली असलेल्या डोळ्यांमझ्ये शरीरातील इतर कुठल्याही भागापेक्षा अधिक तापमानाची नोंद होत असते. तर दुसरीकडे बोटे ही शरीराच्या पेरीफेरल पाथवर असतात. त्यामुळे तिथेही योग्य तापमानाची नोंद होऊ शकते.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सIndiaभारत