coronavirus: मुलांनो, हा 'मामा' तुम्हाला सायकल घेऊन देईन, 'त्या' दानशूर चिमुकल्यांना मुख्यमंत्र्यांचं वचन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 01:01 PM2020-03-30T13:01:36+5:302020-03-30T13:03:17+5:30
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथील रविशंकर यांचा मृत्यू झाला होता, पण कोरोनाच्या भितीमुळे नातेवाईकांनीही रविशंकर यांच्या घरी येणं टाळले. आप्तेष्ठ आणि सगेसोयरेही मृत्युनंतर
भोपाळ - कोरोना आला अन् जणू हरवेली माणूसकी जागोजागी पाहायला मिळाली. माणसाला माणूस म्हणन वागविण्यासाठी झटताना माणूस दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोट्यवधींची श्रद्धास्थान असलेली मंदिरे, मशिदी, चर्चा, गुरुद्वारे आणि इतर प्रार्थनास्थळही बंद करण्यात आली आहे. मनुष्य प्राण्याला एका महाभयंकर रोगापासून वाचविण्यासाठी माणूसच कामाला लागला आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत आणि गरिबांपासून ते अब्जाधीशांपर्यंत प्रत्येकजण आपलं योगदान या लढाईत देत आहेत. कोरोनाचे संकट हे देशावरील संकट मानून प्रत्येकजण झटताना दिसत आहे. मध्य प्रदेशमध्ये अशाच मदतीची एक घटना सोशल मीडियात व्हायरल झाली. या मदतीची दखल राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घेतली आहे.
उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथील रविशंकर यांचा मृत्यू झाला होता, पण कोरोनाच्या भितीमुळे नातेवाईकांनीही रविशंकर यांच्या घरी येणं टाळले. आप्तेष्ठ आणि सगेसोयरेही मृत्युनंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येईनात. त्यावेळी, रविशंकर यांच्या घराशेजारील मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेऊन रविशंकर यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. एकीकडे माणूसकीचं हे उदाहरण असताना, दुसरीकडे आपल्या २५ वर्षीय मुलाच्या निधनाचे दु:ख विसरुन एक आई मुलाच्या तेराव्याला मास्कचे वाटप करणार आहे. तसेच, मध्य प्रदेशमध्ये दोन शाळकरी मुलांनी सायकल घेण्यासाठी गल्ल्यात जमा केलेली रक्कम कोरोनाग्रस्त आणि भुकेल्या गरिबांसाठी देऊ केली. आपल्या घरातून नोटांचा बंडल घेऊन ही मुले कजार्डा पोलीस ठाण्यात पोहोचली. येथील पोलीस अधिकाऱ्यांकडे या चिमुकल्यांनी आपल्या जवळील सर्वच रक्कम दिली.
नीमच के मेरे भांजों, तुमने साइकिल हेतु रखे अपने पैसे #COVID19 से लड़ने व गरीबों, मजदूरों को भोजन कराने के लिए थाने में दिये हैं, मैं तुम्हारी इस पवित्र भावना का अभिनंदन करता हूं। कोरोना को परास्त कर तुम्हारे लिए साइकिल लेकर तुम्हारा मामा मिलने आएगा। सदा खुश रहो, स्नेह, आशीर्वाद! pic.twitter.com/URnhRrTozA
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) March 30, 2020
शाळकरी मुलांच्या या दातृत्वाचे पोलीस अधिकाऱ्यालाही कौतुक वाटले, मुलांनो हे पैसे तुम्ही परत घेऊन जा, मी गरिबांना अन्न पुरवतो, असे तो अधिकारी म्हणाला. मात्र, तरीही ते पैसे परत नेण्यास मुलांनी नकार दिला. या चिमुकल्यांच्या कार्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही कौतुक केलंय. आपल्या या पवित्र भावनेचं मी अभिनंदन करतो, आणि कोरोनाचा पराभव करुन तुमचा हा मामा तुमच्यासाठी सायकल घेऊन येईल, असे आश्वासनही सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिलंय.