नवी दिल्लीः कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक परराज्यातील प्रवासी मजूर अडकून पडले आहेत. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात जवळपास ४० दिवसांनंतर मजुरांना घरी परतण्यासाठी रेल्वेनं विशेष ट्रेन सोडल्या आहेत. तरीसुद्धा अनेक मजूर अद्यापही अडकून पडलेले आहेत. गुजरातमधल्या सूरतमध्येही प्रशासनावरील वाढती नाराजी आणि असंतोषामुळे सोमवारी मजूर (प्रवासी कामगार) पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. आम्हाला घरी पाठवा अशी मागणीसुद्धा या मजूर आणि कामगारांनी केली आहे. सूरतमध्ये पोलीस आणि कामगार यांच्यात हिंसक झडप झाली, त्यानंतर पोलिसांनाही अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. मुंबई आणि बंगळुरूमध्ये पोलीस आणि मजुरांमध्ये संघर्ष झाल्याचा घटना समोर आल्या आहेत.परराज्यातील हे सर्व मजूर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांतील आहेत. 23 मार्चला गुजरातमध्ये लॉकडाऊन घोषित झाल्यापासून सूरत येथे प्रवासी मजूर आणि पोलीस हे अनेकदा आमनेसामने आले आहेत. सोमवारी वारेली येथे मजुरांच्या एका गटाने पोलिसांवर दगडफेक सुरू केल्यावर हिंसाचार सुरू झाला. वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. यामध्ये महिलांचा देखील समावेश होता.पोलिसांनी 200 जणांना केली अटक हे मजूर शुक्रवारी रात्री आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते, परंतु त्यांना गुजरात सीमेवरून परत पाठवण्यात आले. त्यानंतर संतप्त झालेले हे मजूर रस्त्यावर उतरले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला. पोलीस दांडक्यानं मजूर आणि कामगारांना रस्त्यावर धावताना मारत असल्याचंही व्हिडीओतून समोर आलं आहे. या घटनेनंतर 200 लोकांना हिंसाचार पसरल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या हिंसाचारामध्ये जवळपास 3,000 मजूर सहभागी होते, त्यातील काहींनी पोलिसांवर अॅसिड बाटल्याही फेकल्या,” असे सूरत रेंजचे आयजी राजकुमार यांनी सांगितले. 'घरी जाण्यासाठी खिशातले सर्व पैसे दिले'नवभारत टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, वाराणसी येथील टेक्सटाइल कामगार राधेश्याम त्रिपाठी म्हणाले की, ते कधीही सूरतला परत येणार नाहीत. आम्हाला कुत्र्यांप्रमाणेच गुजरातमधल्या दाहोदमधून पळवण्यात आले. घरी जाण्यासाठी आम्ही पॉकेटमनीचे सर्व पैसे खर्च केले, परंतु तरीही आमचा छळ करण्यात आला आणि आम्हाला परत पाठविण्यात आले. आम्हाला आमच्या घरी जायचं आहे, हाच आमचा गुन्हा आहे. बिहारमधील गया येथील रहिवासी गिरीशंकर मिश्रा म्हणतात, "गुजरातमध्ये आम्हाला अशीच वागणूक देण्यात आल्यास आम्ही परत येणार नाही." पोलीस आमच्याबरोबर दहशतवाद्यांसारखे वागतात, अशा भावना मजुरांनी व्यक्त केल्या आहेत.मजूर अन् कामगारांना दाहोद येथे रोखण्यात आलेराधेश्याम व इतर 56 मजूर घेऊन जाणारी बस दाहोद चेक पोस्टवर थांबवली. त्यांच्याप्रमाणेच इतर बऱ्याच कामगारांकडेही दुर्लक्ष केलं जात आहे. वलसाड जिल्ह्यातही हजारो मजुरांनी रस्ते रोखले आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत 15,558 प्रवाशांसह 13 गाड्या यूपी आणि ओडिशाकडे रवाना झाल्या आहेत, तर दोन गाड्या धनबाद व पटनाकडे रवाना होतील.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
इराणकडून चलनात मोठा बदल, चार शून्य हटवले अन् नावही बदललं
चिनी ड्रॅगनला घायाळ करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची खेळी; अमेरिकेकडून मोठी घोषणा
CoronaVirus News: सरकारनं सध्या लोकांच्या हाती पैसा देऊ नये, त्याऐवजी...; अभिजीत बॅनर्जींची सूचना
Coronavirus: दारू महागली! 'या' राज्यात मद्यावर ७० टक्के अतिरिक्त कर लागणार