नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशात २०२०-२१चे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब होणार आहे. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नेमलेल्या समितीने शिफारस केली आहे की, उच्चशिक्षणाच्या वर्षाची सुरुवात नेहमी जुलैच्या मध्यापासून होते; पण यंदा सप्टेंबर महिन्यापासून महाविद्यालये सुरू केली जावीत.कोरोनाच्या साथीमुळे देशातील सर्व शाळा, महाविद्यालये १६ मार्चपासून बंदच आहेत. २०२०-२१चे शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू करावे, परीक्षा कधी घ्याव्यात याबाबत पाहणी करण्यासाठी यूजीसीने सात सदस्यांची एक समिती नेमली होती. तिने आपला अहवाल यूजीसीला शुक्रवारी सादर केला आहे.या अहवालात समितीने म्हटले आहे की, कोणत्याही शाखेच्या प्रवेशासाठी पात्रता परीक्षा कोरोना साथीमुळे वेळेवर होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्षही जुलैच्या मध्याला सुरू होणार नाही याची सर्वांनाच पूर्वकल्पना होती.मात्र हे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास जुलैनंतर आणखी किती महिन्यांचा काळ लागणार याचे उत्तर विद्यार्थी, शिक्षक , पालकअशा सर्वांनाच हवे होते. तसेच जुलैमध्ये होणाऱ्या काही परीक्षा यंदाच्या वर्षी घेणे शक्य नसल्याचे या समितीने म्हटले आहे. हरयाणा केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू आर. सी. कुहाड हे या समितीचे प्रमुख आहेत. इंटर-युनिव्हर्सिटी अॅक्सिलेटर सेंटरचे संचालक ए. सी. पांडे, वनस्थळी विद्यापीठाचे कुलगुरू आदित्य शास्त्री, पंजाब विद्यापीठाचे कुलगुरू राजकुमार आदींचा या समितीतील सदस्यांत समावेश आहे.>शैक्षणिक वेळापत्रक तयार करणारयंदाचे शैक्षणिक वर्ष कधी सुरू करावे यासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालातील शिफारसीनुसार विद्यापीठ अनुदान आयोग विद्यापीठ परीक्षांचे तसेच शैक्षणिक वेळापत्रक तयार करेल. उच्चशिक्षण देणाºया संस्थांनी केंद्र सरकारला अपेक्षित असलेल्या मुदतीतच महाविद्यालये सुरू करणे अपेक्षित आहे.
Coronavirus :सप्टेंबरपासून महाविद्यालये उघडण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 3:43 AM